T20 World Cup 2024: IND vs PAK सामन्यासाठी ICC चा मोठा निर्णय! क्रिकेट फॅन्सचा आनंद गगनात मावेना

Reserve Day For IND vs PAK Match: टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला येत्या १ जूनपासून प्रारंभ होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंड संघाविरुद्ध होणार आहे.
icc announced reserve day for icc t20 world cup india vs pakistan match and knock out matches cricket news in marathi
icc announced reserve day for icc t20 world cup india vs pakistan match and knock out matches cricket news in marathi Saam tv news
Published On

Reserve Day For IND vs PAK Match, ICC T20 World Cup 2024:

टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला येत्या १ जूनपासून प्रारंभ होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंड संघाविरुद्ध होणार आहे. तर ज्या सामन्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत तो भारत - पाकिस्तान सामना ९ जून रोजी खेळवला जाईल. या सामन्यापूर्वी आयसीसीने मोठी घोषणा केली आहे.

भारत - पाकिस्तान सामन्याचा क्रेझ इतका आहे की, सामन्याचं वेळापत्रक समोर येताच तिकीट विक्रीला सुरुवात झाली आहे. हा सामन्याचा रोमांच आणखी वाढवण्यासाठी आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी आयसीसीने राखीव दिवसाची घोषणा केली आहे. भारत - पाकिस्तान सामन्यासह सेमी फायनल आणि फायनल सामन्यासाठी देखील राखीव दिवस असणार आहे. जर या सामन्यावेळी पावसाने हजेरी लावली आणि सामना रद्द करण्यात आला तर हा सामना राखीव दिवशी खेळवला जाईल.

icc announced reserve day for icc t20 world cup india vs pakistan match and knock out matches cricket news in marathi
WPL 2024 Final: विराटचं स्वप्न स्मृती मंधाना पूर्ण करणार? दिल्लीला नमवत इतिहास रचण्याची संधी

आयसीसीचा मोठा निर्णय..

दुबईत आयसीसीची बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यानुसार साखळी फेरीतील सामन्यांसाठी आणि नॉकआऊट फेरीतील सामन्यांसाठी निकालाची पद्धत वेगळी असणार आहे. साखळी फेरीतील सामन्यांचा निकाल लावण्यासाठी दोन्ही संघांनी ५-५ षटक खेळणं गरजेचं असणार आहे. तर नॉकआऊट फेरीतील सामन्यांचा निकाल लावण्यासाठी दोन्ही संघांनी १०-१० षटक खेळणं गरजेचं असणार आहे. या निकषांच्या विजेत्या संघाची घोषणा केली जाईल. (Cricket news in marathi)

icc announced reserve day for icc t20 world cup india vs pakistan match and knock out matches cricket news in marathi
WPL 2024, Final: RCB चं यंदाही जेतेपद जिंकणं कठीण! या रेकॉर्डमुळे वाढलं टेन्शन

या स्पर्धेला येत्या १ जूनपासून प्रारंभ होणार आहे. हे सामने वेस्टइंडिज आणि अमेरिकेत रंगणार आहेत. स्पर्धेतील पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही संघांमध्ये होणार आहे. तर भारतीय संघाबद्दल बोलायचं झालं तर, भारताचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध होणार आहे. त्यानंतर पाकिस्तान, कॅनडा आणि अमेरिकेबरोबर होणार आहे. या स्पर्धेतील सेमीफायनलचा सामना २८ जून रोजी होणार असून अंतिम सामना २९ जून रोजी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com