

आयसीसीने क्रिकेट कॅनडाचे सदस्यत्व तात्काळ प्रभावाने निलंबित केले.
कॅनडा क्रिकेट बोर्डावर नियमभंग आणि प्रशासनातील त्रुटींचे आरोप.
अहमदाबादमधील आयसीसी बोर्ड बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
अहमदाबाद येथे झालेल्या आयसीसी बोर्डाच्या बैठकीनंतर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने क्रिकेट कॅनडाचे सदस्यत्व तात्काळपणे निलंबित केले आहे. कॅनेडियन क्रिकेट बोर्डने नियमांचे आणि जबाबदाऱ्यांचे योग्यरित्या पालन करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे निलंबित करण्याचा निर्णय बोर्डाने हा घेतला आहे.
आयसीसीचे सदस्य म्हणून टिकून राहण्यासाठी कोणत्याही देशाला ज्या आवश्यक नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे, त्या नियमांचे क्रिकेट कॅनडाने उल्लंघन केल्याचं आयसीसीनं म्हटलंय.
कॅनेडियन क्रिकेट बोर्डने नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याने ते दोषी आढळले आहे.कॅनडाने एक स्वच्छ आणि निष्पक्ष प्रणाली राखण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा भंग केला आहे. ते संशयास्पद कारवायांमध्ये सहभागी असल्याचं आयसीसीने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मात्र आयसीसीने अद्याप उल्लंघनाची व्याप्ती किंवा त्याचे नेमके कारण सविस्तरपणे सांगतिले नाहीये. आता या मोठ्या निर्णयानंतर कॅनेडियन संघ पुढील टी-२० विश्वचषकात सहभागी होऊ शकेल की नाही, हे अद्याप कळू शकले नाहिये.
दरम्यान आयसीसीच्या बैठकीत सांगितलं की, कॅनडाच्या नॅशनल कॅनेडियन क्रिकेट टीम सरव् आयसीसीसच्या सर्व स्पर्धा आणि सामने खेळू शकणार आहे. यासह खेळाडूंचे नुकसान टाळण्यासाठी आयसीसी एका विशेष प्रणालीद्वारे संघाच्या निधीवर देखरेख ठेवेल. इतकेच नव्हे तर, आयसीसीने कॅनेडियन बोर्डाला सुधारणा करण्यासाठी काही अटी घातल्या आहेत.
त्या पूर्ण केल्याशिवाय त्यांचे सदस्यत्व पुन्हा बहाल केले जाणार नाही. २०२६ च्या टी२० विश्वचषकात कॅनेडियन क्रिकेट संघ 'अ' गटाचा भाग होता. यावर्षी भारत आणि श्रीलंका यांनी आयोजित केलेल्या २०२६ च्या टी२० विश्वचषकात कॅनेडियन क्रिकेट संघाने भाग घेतला होता. संघ 'अ' गटाचा भाग होता आणि गट टप्प्यातच तो बाद झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.