World Cup Schedule : वनडे वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर, भारताचे सामने कुणासोबत? पाकिस्तानविरोधात कधी भिडणार? A टू Z माहिती

ODI World Cup 2027, India vs Pakistan : आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२७ चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियात होणाऱ्या स्पर्धेत १४ संघ, १२ मैदानांवर ५७ सामने खेळवले जाणार आहेत. भारताच्या सामन्यांसह भारत-पाकिस्तान लढतीची माहिती जाणून घ्या.
ODI World Cup 2027 schedule announcement LIVE updates
ODI World Cup 2027 schedule announcement LIVE updates
Published On: 

ODI World Cup 2027 schedule announcement LIVE updates : दक्षिण आफ्रिकामध्ये होणाऱ्या २०२७ च्या विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भारतीय संघ पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियासोबत ए ग्रुपमध्ये आहे. तर यजमान दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे संघ दुसऱ्या ग्रुपमध्ये आहेत. आजपासूनच तिकिटाची विंडो सुरू झाली आहे. (2027 ODI World Cup Full Schedule: India-Pakistan Clash, 14 Teams, 12 Venues and 57 Matches Explained)

दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळवल्या जाणाऱ्या या क्रिकेटच्या महाकुंभातील सामने, फॉरमॅट आणि सुरुवातीचे गट आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केले आहेत. (Follow India’s fixtures, India vs Pakistan, dates, venues, groups, tickets and latest news)

ODI World Cup 2027 schedule announcement LIVE updates
Accident : बॉलिवूड अभिनेत्रीचा परदेशात भयानक अपघात, रुग्णालयात उपचार सुरू

भारताचे ग्रुप स्टेज सामने (India Matches Schedule):

  • गुरुवार, ७ ऑक्टोबर: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (केप टाऊन)

  • रविवार, १० ऑक्टोबर:भारत विरुद्ध पाकिस्तान (जोहान्सबर्ग)

  • गुरुवार, १४ ऑक्टोबर: भारत विरुद्ध अफगाणिस्तान (त्श्वाने)

  • रविवार, १७ ऑक्टोबर: भारत विरुद्ध क्वालिफायर A (ब्लूमफॉन्टेन)

  • रविवार, २४ ऑक्टोबर: झिम्बाब्वे विरुद्ध भारत (व्हिक्टोरिया फॉल्स)

2027 ODI World Cup Full Schedule: India-Pakistan Clash, 14 Teams, 12 Venues and 57 Matches Explained
2027 ODI World Cup Full Schedule: India-Pakistan Clash, 14 Teams, 12 Venues and 57 Matches Explained

विश्वचषक २०२७ चे संपूर्ण वेळापत्रक

  • शनिवार, २ ऑक्टोबर: क्वालिफायर १ विरुद्ध क्वालिफायर ३ (विंडहॉक)

  • सोमवार, ४ ऑक्टोबर: क्वालिफायर १ विरुद्ध क्वालिफायर २ (विंडहॉक)

  • बुधवार, ६ ऑक्टोबर: क्वालिफायर २ विरुद्ध क्वालिफायर ३ (विंडहॉक)

  • गुरुवार, ७ ऑक्टोबर: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (केप टाऊन)

  • शुक्रवार, ८ ऑक्टोबर: पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान (त्श्वाने)

  • शुक्रवार, ८ ऑक्टोबर: इंग्लंड विरुद्ध बांगलादेश (विंडहॉक)

  • शनिवार, ९ ऑक्टोबर: झिम्बाब्वे विरुद्ध क्वालिफायर A (बुलावायो)

  • शनिवार, ९ ऑक्टोबर: दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड (केप टाऊन)

  • रविवार, १० ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान (जोहान्सबर्ग)

  • रविवार, १० ऑक्टोबर: श्रीलंका विरुद्ध क्वालिफायर B (विंडहॉक)

  • सोमवार, ११ ऑक्टोबर: झिम्बाब्वे विरुद्ध अफगाणिस्तान (बुलावायो)

  • मंगळवार, १२ ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्वालिफायर A (पार्ल)

  • मंगळवार, १२ ऑक्टोबर: न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश (कुगोम्पो सिटी)

  • बुधवार, १३ ऑक्टोबर: इंग्लंड विरुद्ध श्रीलंका (विंडहॉक)

  • बुधवार, १३ ऑक्टोबर: दक्षिण आफ्रिका विरुद्ध क्वालिफायर B (पार्ल)

  • गुरुवार, १४ ऑक्टोबर: भारत विरुद्ध अफगाणिस्तान (त्श्वाने)

  • शुक्रवार, १५ ऑक्टोबर: पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर A (ब्लूमफॉन्टेन)

  • शुक्रवार, १५ ऑक्टोबर: झिम्बाब्वे विरुद्ध ऑस्ट्रेलिया (हरारे)

  • शनिवार, १६ ऑक्टोबर: श्रीलंका विरुद्ध बांगलादेश (डर्बन)

  • शनिवार, १६ ऑक्टोबर: दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड (गकेबरहा)

  • रविवार, १७ ऑक्टोबर: भारत विरुद्ध क्वालिफायर A (ब्लूमफॉन्टेन)

  • रविवार, १७ ऑक्टोबर: न्यूझीलंड विरुद्ध क्वालिफायर B (हरारे)

  • सोमवार, १८ ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान (कुगोम्पो सिटी)

  • मंगळवार, १९ ऑक्टोबर: झिम्बाब्वे विरुद्ध पाकिस्तान (हरारे)

  • मंगळवार, १९ ऑक्टोबर: दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश (डर्बन)

  • बुधवार, २० ऑक्टोबर: न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका (जोहान्सबर्ग)

  • बुधवार, २० ऑक्टोबर: इंग्लंड विरुद्ध क्वालिफायर B (हरारे)

  • गुरुवार, २१ ऑक्टोबर: अफगाणिस्तान विरुद्ध क्वालिफायर A (कुगोम्पो सिटी)

  • शुक्रवार, २२ ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान (पार्ल)

  • शुक्रवार, २२ ऑक्टोबर: दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका (जोहान्सबर्ग)

  • शनिवार, २३ ऑक्टोबर: इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (गकेबरहा)

  • शनिवार, २३ ऑक्टोबर: बांगलादेश विरुद्ध क्वालिफायर B (त्श्वाने)

  • रविवार, २४ ऑक्टोबर: झिम्बाब्वे विरुद्ध भारत (व्हिक्टोरिया फॉल्स)

  • सोमवार, २५ ऑक्टोबर: A2 विरुद्ध B3 (जोहान्सबर्ग)

  • मंगळवार, २६ ऑक्टोबर: B1 विरुद्ध A3 (गकेबरहा)

  • बुधवार, २७ ऑक्टोबर: B2 विरुद्ध AB4 (त्श्वाने)

  • गुरुवार, २८ ऑक्टोबर: A1 विरुद्ध A2 (व्हिक्टोरिया फॉल्स)

  • शुक्रवार, २९ ऑक्टोबर: B1 विरुद्ध B3 (कुगोम्पो सिटी)

  • शनिवार, ३० ऑक्टोबर: A3 विरुद्ध AB4 (व्हिक्टोरिया फॉल्स)

  • रविवार, ३१ ऑक्टोबर: B2 विरुद्ध A1 (जोहान्सबर्ग)

  • सोमवार, १ नोव्हेंबर: A2 विरुद्ध B1 (व्हिक्टोरिया फॉल्स)

  • मंगळवार, २ नोव्हेंबर: B3 विरुद्ध AB4 (केप टाऊन)

  • बुधवार, ३ नोव्हेंबर: B2 विरुद्ध A3 (डर्बन)

  • गुरुवार, ४ नोव्हेंबर: A1 विरुद्ध B1 (पार्ल)

  • शुक्रवार, ५ नोव्हेंबर: A2 विरुद्ध AB4 (डर्बन)

  • शनिवार, ६ नोव्हेंबर: B2 विरुद्ध B3 (ब्लूमफॉन्टेन)

  • रविवार, ७ नोव्हेंबर: A1 विरुद्ध A3 (केप टाऊन)

  • सोमवार, ८ नोव्हेंबर: B1 विरुद्ध AB4 (डर्बन)

  • मंगळवार, ९ नोव्हेंबर: B2 विरुद्ध A2 (गकेबरहा)

  • बुधवार, १० नोव्हेंबर: A3 विरुद्ध B3 (ब्लूमफॉन्टेन)

  • गुरुवार, ११ नोव्हेंबर: A1 विरुद्ध AB4 (गकेबरहा)

  • शुक्रवार, १२ नोव्हेंबर: B2 विरुद्ध B1 (केप टाऊन)

  • शनिवार, १३ नोव्हेंबर: A2 विरुद्ध A3 (ब्लूमफॉन्टेन)

  • रविवार, १४ नोव्हेंबर: A1 विरुद्ध B3 (डर्बन)

  • बुधवार, १७ नोव्हेंबर: सेमीफायनल १ (केप टाऊन)

  • गुरुवार, १८ नोव्हेंबर: सेमीफायनल २ (त्श्वाने)

  • रविवार, २१ नोव्हेंबर: अंतिम सामना (जोहान्सबर्ग)

ग्रुप स्टेज (गट फेरी):

मुख्य फेरीत १२ संघांना प्रत्येकी ६ च्या दोन गटांत विभागले जाईल. प्रत्येक संघ आपल्या गटातील उर्वरित ५ संघांशी प्रत्येकी एक सामना खेळेल. दोन्ही गटांतील अव्वल ३-३ संघ आणि चौथ्या स्थानावरील सर्वोत्तम एक संघ असे एकूण ७ संघ 'सुपर ७' फेरीत पात्र ठरतील.

'सुपर ७' मधील अव्वल ४ संघ उपांत्य फेरीत (Semi-Finals) प्रवेश करतील. २१ नोव्हेंबर २०२७ रोजी अंतिम सामना खेळवला जाईल.

ODI World Cup 2027 schedule announcement LIVE updates
Kalyan Shiv Sena : 'उद्याच २५ लाख दे, नाहीतर...' शिवसेना नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाणे जिल्ह्यात पुन्हा खळबळ

कोणत्या ग्रुपमध्ये कोण कोणते संघ?

ग्रुप A (Group A):

1. अफगाणिस्तान (Afghanistan)

2. ऑस्ट्रेलिया (Australia)

3. भारत (India)

4. पाकिस्तान (Pakistan)

5. झिम्बाब्वे (Zimbabwe)

6. क्वालिफायर A (Qualifier A)

ग्रुप B (Group B):

1. बांगलादेश (Bangladesh)

2. इंग्लंड (England)

3. दक्षिण आफ्रिका (South Africa)

4. श्रीलंका (Sri Lanka)

5. न्यूझीलंड (New Zealand)

6. क्वालिफायर B (Qualifier B)

ODI World Cup 2027 schedule announcement LIVE updates
रोहित शर्मा २०२७ चा वर्ल्ड कप खेळणार की नाही? हिटमॅनने स्पष्टच सांगून टाकलं,गिलच्या कॅप्टनशीपवरही भाष्य

२०२७ आयसीसी वनडे वर्ल्ड कप कसा असेल? (ICC Men's ODI World Cup 2027)

आगामी २०२७ वनडे वर्ल्ड कप मध्ये एकूण १४ संघ सहभागी होणार आहेत. क्रिकेट जगतातील या सर्वात मानाच्या चषकासाठी १२ मैदानांवर तब्बल ५७ सामने खेळवले जातील. २०२७ च्या विश्वचषक स्पर्धेची सुरुवात २ ऑक्टोबर २०२७ रोजी विंडहॉक (Windhoek) येथे होणाऱ्या 'सुपर सिरीज'ने (Super Series) होईल. ही तीन संघांची स्पर्धा असेल, यातून मुख्य ग्रुप स्टेजमधील शेवटचा (१४ वा) संघ निवडला जाईल. ग्रुप स्टेज (Group Stage): उर्वरित १२ संघांना प्रत्येकी ६ संघांच्या दोन गटांत विभागले जाईल. दोन्ही गटांतील उत्कृष्ट कामगिरी करणारे एकूण ७ संघ 'सुपर ७' फेरीत प्रवेश करतील. 'सुपर ७' मधील अव्वल ४ संघ उपांत्य फेरीत (Semi-finals) पोहोचतील, तर या स्पर्धेचा अंतिम सामना २१ नोव्हेंबर २०२७ रोजी खेळवला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com