Accident : बॉलिवूड अभिनेत्रीचा परदेशात भयानक अपघात, रुग्णालयात उपचार सुरू

Nushrratt Bharuccha Accident : बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा बालीमध्ये अपघातात जखमी झाल्याचे वृत्त आहे. तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्या दुखापतीची तीव्रता अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेली नाही.
Nushrratt Bharuccha Hospitalised
Nushrratt Bharuccha Hospitalised
Published On: 

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत भरूचा हिचा इंडोनेशियातील बाली (Bali) बेटावर अपघात झाला आहे. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ही घटना घडली असून, अपघातात दुखापत झाल्यामुळे तिला तातडीने तेथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हा अपघात नेमका कसा झाला आणि नुसरतची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत तिच्याकडून किंवा तिच्या टीमकडून अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. नुसरतकडूनही अपघाताबाबत अद्याप कोणतीही अपडेट दिलेली नाही. सोशल मीडियावर नुसरतच्या चाहत्यांमध्ये या अपघाताबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत.

Nushrratt Bharuccha Hospitalised
CNG Price : गॅस सिलिंडरनंतर सीएनजीही महागला, पाहा नवे दर, महिन्याच्या पहिल्याच दिवशी सामन्यांना झटका

मात्र, वैद्यकीय उपचारांमुळे तिला काही दिवस बालीतच राहावे लागणार असून तिचा भारतात परतण्याचा प्लॅन सध्या टळला आहे. ही बातमी समजताच सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत

Nushrratt Bharuccha Hospitalised
Beach Accident : रायगडमध्ये मोठी दुर्घटना! दिवेआगर समुद्रात पुण्यातील ८ पर्यटकांचा बुडून मृत्यू

टायगर श्रॉफसोबत आगामी चित्रपट

दरम्यान, नुसरत भरूचा लवकरच अभिनेते टायगर श्रॉफसोबत एका नव्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या दोघांची जोडी पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर येत आहे. चित्रपटाच्या कथेला योग्य न्याय देऊ शकेल अशाच अभिनेत्रीची दिग्दर्शकाला गरज होती, म्हणूनच नुसरतची निवड करण्यात आल्याचे समजते. या चित्रपटात पश्मिना रोशन, अभिषेक बॅनर्जी आणि एलविश यादव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com