गुजरातचा धमाकेदार विजय; आक्रमक गोलंदाजीपुढे हैदराबादच्या फलंदाजांनी गुडघे टेकले, शुभमनचा संघ ठरला नंबर वन

Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad : गुजरातने हैदराबादच्या विरोधात धमाकेदार विजय मिळवला आहे. गुजरातच्या गोलंदाजीपुढे हैदराबादच्या फलंदाजांनी गुडघे टेकले.
Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad news
Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad Saam tv
Published On
Summary

आयपीएलच्या ५६ व्या सामन्यात गुजरातची बाजी

गुजरातच्या खेळीपुढे हैदराबादचा संघ ढेर

गुजरातचा संघ पॉइंट टेबलमध्ये ठरला नंबर वन

आयपीएल स्पर्धेतील ५६ व्या सामन्यात गुजरात टायटन्सच्या आक्रमक खेळीपुढे सनरायजर्स हैदराबादला लाजीरवाणा पराभवाचा सामना करावा लागला. गुजरातने दिलेल्या १६८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ 86 धावांवर गारद झाला. आजच्या विजयानंतर गुजरातचा संघ पॉइंट टेबलमध्येही नंबर वन ठरला आहे.

Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad news
RCB vs LSG: आरसीबीचा शानदार विजय; लखनौला चीतपट करताच बेंगळुरू संघाची पॉईंट्स टेबलमध्ये सरशी, मुंबई, केकेआरचं टेन्शन वाढलं

यंदाच्या आयपीएल सीझनमध्ये गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद संघ चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. गुजरात टायटन्सने १२ पैकी ८ सामने जिंकले आहेत. गुजरातकडे आता १६ गुण झाले आहेत. तर सनरायजर्स हैदराबादने १२ सामन्यापैकी ७ सामने जिंकले आहेत. सनरायजर्स हैदराबादचे एकूण १४ गुण झाले आहेत. पॉइंट टेबलमध्ये हैदराबाद तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.

हैदराबादचा लाजीरवाणा पराभव

सनरायजर्स हैदराबादची सुरुवात खराब झाली. हैदराबादने पॉवरप्लेमध्ये ४ विकेट गमावले. मोहम्मद सिराजने ट्रेविस हेडला शून्यावर बाद केले. कगिसो रबाडाने अभिषेक शर्मा (६), ईशान किशन (१) आणि स्मरण रविचंद्रन (९) धावांवर बाद केले. स्मरण बाद झाल्यानंतर हैदराबादची धावसंख्या ३२/४ इतकी झाली. सलील अरोराने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु तो मैदानावर जास्त वेळ टिकू शकला नाही. प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर सलील अवघ्या १६ धावांवर बाद झाला.

Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad news
IPL 2026: प्रफुल्ल हिंगे आणि हुसैनच्या भेदक गोलंदाजीसमोर राजस्थानचा सुफडासाफ; हैदराबादचा शानदार विजय

होल्डरनेही एकाच षटकात हेनरिक क्लासने आणि नीतीश कुमार रेड्डीला बाद केले . त्यानंतर शिवांग कुमार आणि प्रफुल्ल हिंगे स्वस्तात माघारी परतले. गुजरातकडून कगिसो रबाडा, जेसन होल्डरने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.

तत्पूर्वी, गुजरात टायटन्सने टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ५ चेंडू गमावून १६८ धावा केल्या. गुजरातकडून वॉशिंग्टन सुंदर आणि साई सुदर्शनने चांगली फलंदाजी केली. सुदर्शनने ४४ चेंडूत ६१ धावा केल्या. यात ५ चौकार आणि २ षटकाराचा समावेश आहे. सुंदरने ३३ चेंडूवर ५० धावा कुटल्या. दोघांनी या सामन्यात अर्धशतकी खेळी खेळली. दोघांच्या खेळीमुळे संघाची धावसंख्या सहज १५० पार पोहोचली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com