RCB vs LSG: आरसीबीचा शानदार विजय; लखनौला चीतपट करताच बेंगळुरू संघाची पॉईंट्स टेबलमध्ये सरशी, मुंबई, केकेआरचं टेन्शन वाढलं

IPL 2026, RCB vs LSG: आयपीएल २०२६ च्या २३ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने लखनौ सुपरजायंट्सचा ५ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना लखनौचा संघ १४६ धावांवर सर्वबाद झाला.
RCB vs LSG: आरसीबीचा शानदार विजय; लखनौला चीतपट करताच बेंगळुरू संघाची पॉईंट्स टेबलमध्ये सरशी, मुंबई, केकेआरचं टेन्शन वाढलं
Published On

गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेगळुरूने आयपीएल २०२६ च्या २३ व्या सामन्यात दणदणीत विजय नोंदवला. घरच्या मैदानात आरसीबीने लखनौ सुपर जायंट्सचा ५ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना लखनौचा संघ २० षटकांत १४६ धावांवर ऑल ऑऊट झाला होता. प्रत्युत्तरात,आरसीबीने १६ व्या षटकात ५ गडी गमावून १४७ धावांचे लक्ष्य पूर्ण केले.

या विजयासह आरसीबीने या हंगामातील आपला चौथा विजय नोंदवला. राजस्थान रॉयल्सला मागे टाकत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. ५ सामन्यांत ४ विजयांसह आरसीबीचे आता ८ गुण झाले आहेत. राजस्थानचेही ८ गुण आहेत, परंतु आरसीबीचा नेट रन रेट अधिक चांगला आहे.

लखनौच्या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या डावाची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात फिल सॉल्टच्या रूपाने संघाला पहिला धक्का बसला. मात्र विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी दुसऱ्या विकेटसाठी शानदार अर्धशतकी भागीदारी रचली. पडिक्कल १० धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली ४९ धावांवर बाद झाला.

मधल्या षटकांमध्ये कर्णधार रजत पाटीदार आणि जितेश शर्मा यांनी डाव सावरला आणि संघाला १०० धावांच्या पुढे नेले. जेव्हा आरसीबीने १२२ धावा केल्या, तेव्हा त्यांचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता, पण त्यानंतर सामना लखनौच्या हातून निसटला. अखेरीस १६ व्या षटकात टिम डेव्हिडच्या फटकेबाजीने आरसीबीला विजय मिळवून दिला.आरसीबीकडून विराट कोहलीने सर्वाधिक ४९ धावा केल्या.

त्याआधी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या लखनौ सुपर जायंट्सची सुरुवात खराब झाली. त्यांनी अवघ्या ३५ धावांत दोन गडी गमावले होते. यानंतर लखनौच्या फलंदाजांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला त्यावेळी संघाची धावसंख्या कशीबशी १०० च्या पुढे नेली. ११८ धावांवर निम्मा संघ बाद झाला. त्यानंतर एकापाठोपाठ एक विकेट पडल्या आणि अखेरीस संघ १४६ धावांवर गारद झाला. मिचेल मार्शने सर्वाधिक ४० धावा केल्या. रसिक सलाम दारने ४ बळी घेतले. भुवीने ३, तर कृणाल पांड्याने २ बळी घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com