LSG vs MI, IPL 2024: रोहित वाढदिवशी मुंबईला गिफ्ट देणार? लखनऊविरुद्ध टेन्शन वाढवणारा राहिलाय रेकॉर्ड

LSG vs MI, Head To Head Record Weather Prediction: आज होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना लखनऊ सुपरजायंट्स संघाविरुद्ध होणार आहे.
GT vs MI head to head record weather predictio and match winner prediction amd2000
GT vs MI head to head record weather predictio and match winner prediction amd2000twitter

आयपीएल २०२४ स्पर्धेतील प्लेऑफच्या शर्यतीत टीकून राहण्यासाठी मुंबई इंडियन्स संघासाठी आजचा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. मुंबईचा सामना लखनऊ सुपरजायंट्स संघाविरुद्ध होणार आहे. हा सामना लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर रंगणार आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत ९ पैकी ३ सामने जिंकले आहेत. तर लखनऊ सुपरजायंट्स संघाने ९ पैकी ५ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. दरम्यान कसा राहिलाय या दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड? जाणून घ्या.

कोणाचं पारडं जड?

लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला, तर हे दोन्ही संघ आतापर्यंत ४ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान लखनऊ सुपर जांयट्स संघाने ३ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर मुंबई इंडियन्स संघाला केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. लखनऊ सुपरजायंट्स संघाविरुद्ध खेळताना १८२ धावा ही मुंबईची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. तर १९९ धावी ही लखनऊची सर्वोच्च धावसंख्या आहे.

GT vs MI head to head record weather predictio and match winner prediction amd2000
IPL 2024 Points Table: राजस्थाननंतर KKR ची प्लेऑफच्या दिशेने वाटचाल! दिल्लीचं टेन्शन वाढलं; पाहा गुणतालिका

पिच रिपोर्ट..

हा सामना लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियवर रंगणार आहे. या स्टेडियमची खेळपट्टी स्लो आहे. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारली जात नाही. या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांची जादू पाहायला मिळते. कारण सामना जसजसा पुढे जातो,तसा चेंडू फिरायला लागतो. त्यामुळे फिरकी गोलंदाजांना इथे मदत मिळते.

GT vs MI head to head record weather predictio and match winner prediction amd2000
MS Dhoni Record: एमएस धोनीने रचला इतिहास! IPL मध्ये असा रेकॉर्ड करणारा ठरला जगातील पहिलाच खेळाडू

कसं असेल हवामान?

हा सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होणार आहे. या सामन्यावेळी तापमान २९ डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पाऊस पडण्याची कुठलीही शक्यता नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना २०-२० षटकांचा सामना पाहायला मिळेल.

मुंबई इंडियन्स..

रोहित शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहाल वढेरा, हार्दिक पंड्या( कर्णधार), टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, पीयुष चावला, ल्युक वूड, जसप्रीत बुमराह

लखनऊ सुपरजायंट्स ..

क्विंटन डी कॉक, केएल राहुल(यष्टीरक्षक/कर्णधार), मार्कस स्टोइनिस, दीपक हुड्डा, निकोलस पुरन, क्रुणाल पंड्या, मणिमारन सिद्धार्थ, मॅट हेनरी, रवि बिश्नोई, मोहसिन खान, यश ठाकुर.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com