Glenn Maxwell Six: ग्लेन मॅक्सवेलने लगावला वर्ल्डकप स्पर्धेतील सर्वात लांब षटकार! अय्यरचा रेकॉर्ड मोडला, Video

Glenn Maxwell Six Video: या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने सर्वात लांब षटकार मारला आहे.
viral video
viral video twitter
Published On

Glenn Maxwell 104 meter Six Video:

सुरूवातीच्या काही सामन्यांमध्ये आउट ऑफ फॉर्ममध्ये असलेले ऑस्ट्रेलियन खेळाडू आता फॉर्ममध्ये परतले आहेत. नेदरलँडविरूद्धच्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावले होते.

या सामन्यात त्याने सर्वात जलद शतक ठोकून १०६ धावांची खेळी केली होती. न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात त्याला मोठी खेळी करता आली नाही. मात्र या छोट्या खेळीदरम्यान त्याने गगनचूंबी षटकार मारला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

मॅक्सवेलने मारला वर्ल्डकप स्पर्धेतील सर्वात लांब षटकार..

न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने २४ चेंडूंचा सामना करत २ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ४१ धावांची खेळी केली. या सामन्यातही तो मोठी खेळी करण्याच्या विचारात होता. मात्र जेम्स नीशमने त्याला बाद करत माघारी धाडले. ४१ धावांच्या खेळीदरम्यान त्याने २ गगनचूंबी षटकार मारले. (Latest sports updates)

मॅक्सवेलने या डावातील ४३ व्या षटकात थेट मैदानाबाहेर षटकार मारला. हे षटक टाकण्यासाठी मिचेल सँटनर गोलंदाजीला आला होता. या षटकात त्याने स्टेप आउट होउन समोरच्या दिशेने १०४ मीटर लांब षटकार मारला आहे.

त्याचा हा षटकार थेट मैदानाच्या बाहेर जाणार होता. यासह त्याने सर्वात लांब षटकार मारण्याच्या बाबतीत श्रेयस अय्यरला मागे सोडलं आहे. श्रेयस अय्यरने १०१ मीटर लांब षटकार मारला होता.

viral video
Babar Azam Statement: अंपायरच्या चुकीच्या निर्णयामुळे सामना गमावला? बाबर आझमने सांगितलं पराभवाचं नेमकं कारण

ऑस्ट्रेलियाने केल्या ३८८ धावा..

या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ३८८ धावांचा डोंगर उभारला.ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने सर्वाधिक १०९ धावांची खेळी केली. तर डेव्हिड वॉर्नरने ८१ धावा चोपल्या. शेवटी ग्लेन मॅक्सवेलने ४१, जोस इंग्लिसने ३८ आणि पॅट कमिन्सने ३७ धावांची खेळी केली.

viral video
David Warner Record: शतक हुकलं तरीदेखील विराटला मागे सोडलं, वॉर्नरच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com