

वनडे वर्ल्डकपसाठी सर्व संघ भारतात दाखल झाले आहेत. ५ ऑक्टोबरपासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या सामन्याने या स्पर्धेची सुरूवात होणार आहे.
दरम्यान आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या गौतम गंभीरने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम बद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
स्टार स्पोर्ट्सवर बोलताना गौतम गंभीरने म्हटले की, 'ज्या शैलीने बाबर आझम फलंदाजी करतो ते पाहता, माझ्या मते तो वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तान संघासाठी ३ ते ४ शतके झळकावू शकतो.' गौतम गंभीरने बाबर आझमचं कौतुक केल्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील त्याने बाबर आझमचे कौतुक केलं होतं. त्यावेळी तो म्हणाला होता की, बाबर आझम यावेळी धुमाकूळ घालू शकतो. बाबर आझम न्यूझीलंडविरूद्ध सराव सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. या सामन्यात त्याने ८० धावा ठोकल्या होत्या.
यंदाचा वर्ल्डकप भारतात खेळवला जाणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. भारतीय संघासाठी रोहित शर्माचा मायदेशातील रेकॉर्ड देखील एक्स फॅक्टर ठरणार आहे. मायदेशात खेळताना रोहित शर्माने ३ दुहेरी शतकं झळकावली आहेत. त्यामुळे गौतम गंभीरने असा विश्वास व्यक्त केला आहे की, रोहित शर्मा भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहचवू शकतो. (Latest sports updates)
गौतम गंभीरने रोहित शर्माबद्दल बोलताना म्हटले की,'भारतीय संघ मायदेशात वर्ल्डकप खेळणार आहे. रोहित शर्माचा मायदेशातील रेकॉर्ड कसा आहे हे सर्वांना माहित आहे. त्याने वनडेत ३-४ दुहेरी शतकं झळकावली आहेत. या कामगिरीच्या जोरावर तो भारतीय संघाला फायनलमध्ये पोहचवू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.