Asian Games 2023: मेडल हुकल्याने ॲथलिटची सटकली; प्रतिस्पर्धी खेळाडूवर टीका करताना पातळी सोडली

Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
asian games transgender controversy in heptathlon swapna barman says nandini is a transgender
asian games transgender controversy in heptathlon swapna barman says nandini is a transgender Twitter
Published On: 

Swapna Barman vs Nandini Agasara:

आशियाई क्रीडा स्पर्धेत नवा वाद पेटल्याचं पाहायला मिळाले आहे. महिलांच्या हेप्टाथलान इव्हेंटमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे.

या स्पर्धेत तृतीयपंथी खेळाडूने पदक जिंकल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. मुख्य बाब म्हणजे हा प्रकार समोर घेऊन येणारी दुसरी तिसरी कोणी नसून भारतीय अॅथलिट आहे.

asian games transgender controversy in heptathlon swapna barman says nandini is a transgender
Asian Games 2023 : चीनचा रडीचा डाव! भारताच्या ज्योती याराजीने 100 मीटर शर्यतीत ठासून मिळवलं रौप्य पदक, काय झाला ड्रामा?

तर झाले असे की, महिलांच्या हेप्टाथलान इव्हेंटमध्ये भारतीय अॅथलिट स्वप्ना बर्मनला चौथ्या क्रमांकावर समाधाना मानावं लागलं. एका क्रमांकामुळे तिचं कांस्यपदक हुकलं. नंदिनी अगसराने तिसऱ्या क्रमांकावर येत कांस्यपदकावर नाव कोरलं.

हेप्टाथलानमध्ये नंदिनी अगसराने कांस्यपदकावर नाव कोरल्यानंतर स्वप्ना बर्मनने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक ट्वीट केलं आहे. तिने आपल्या ट्वीटमध्ये नंदिनीचा तृतीयपंथी म्हणून उल्लेख केला आहे. यासह तिने पदक पुन्हा देण्याची मागणी केली आहे. (Latest sports updates)

swapna barman tweet
swapna barman tweetsaam tv news

स्वप्नाने आपल्या ट्वीटमध्ये लिहीले की, 'चीनच्या हांगझुमध्ये सुरु असलेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत माझं कांस्यपदक एका तृतीयपंथीमुळे हुकलं आहे. मला माझं पदक हवं आहे. कारण हे अॅथलेटीक्सच्या नियमांच्या विरूद्ध आहे. कृपया माझी मदत करा आणि मला साथ द्या.'

नंदिनी अगसराने या स्पर्धेत ५७१२ गुणांसह तिसरं स्थान गाठलं. तर चौथ्या स्थानी असलेल्या स्वप्ना बर्मनने ५७०८ गुणांची कमाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com