Asian Games 2023: भारतीय पुरष अन् महिला संघाला घवघवीत यश!रोलर स्केटिंग इव्हेंटमध्ये कांस्यपदकाने उघडलं खातं

Asian Games 2023 Day 9 Live: नवव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दमदार सुरुवात केली आहे.
Asian Games 2023 Day 9 Live
Asian Games 2023 Day 9 LiveTwitter
Published On

Asian Games 2023 Day 9 Live:

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दहाव्या दिवशीही भारतीय खेळाडूंनी दमदार सुरुवात केली आहे. सुरुवातीलाच भारताच्या पदकांच्या यादीत २ पदकांची भर पडली आहे. भारतीय महिला खेळाडूंनी स्पीड स्केटिंग ३००० मीटर रिले इव्हेंटमध्ये कांस्यपदकाला गवसणी घातली आहे.

तर पुरुषांच्या संघाने स्पीड स्केटिंग ३००० मीटर रिले इव्हेंटमध्ये कांस्यपदकाला गवसणी घातली आहे. यासह भारताची पदकांची संख्या ५५ वर जाऊन पोहोचली आहे.

स्पर्धेच्या नवव्या दिवशी कार्तिका, हिरल, संजना आणि आरती यांनी भारताला पदक मिळवून दिलं आहे. या खेळाडूंनी स्पीड स्केटिंग ३००० मीटर रिले इव्हेंटमध्ये ठराविक अंतर ४ मिनिटे ३४:८६ सेकंदात पूर्ण केलं. यासह भारतीय महिलांचा संघ तिसऱ्या स्थानी राहिला.

Asian Games 2023 Day 9 Live
Asian Games 2023: ना फुटबॉल, ना व्हॉलीबॉल! सेपक टकराव हा खेळ खेळतात तरी कसा? जाणून घ्या A to Z माहिती

भारतीय पुरुष संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, महिलांसह पुरुषांनी देखील कांस्यपदक पटकावलं आहे. आनंद कुमार, सिद्धांत,विक्रम आणि आर्यन पाल या चौघांनी भारताला हे पदक जिंकून दिलं आहे. (Latest sports updates)

Asian Games 2023 Day 9 Live
Asian Games 2023: तेजिंदरपालने इतिहास रचला! गोळाफेकीत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदकावर कोरलं नाव

या २ पदकांसह भारताची पदकांची संख्या आता ५५ वर जाऊन पोहोचली आहे. ज्यात १३ सुवर्णपदकांचा समावेश आहे. तर २१ रौप्य आणि २१ कांस्यपदकांचा समावेश आहे. यजमान चीन २४८ पदकांसह या यादीत अव्वल स्थानी आहे. ज्यात १३६ सुवर्णपदकांचा समावेश आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com