चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने घवघवीत यश मिळवलं आहे. स्पर्धेतील आठव्या दिवशीही भारतीय खेळाडूंनी पदकांचा पाऊस पाडला आहे.
गोळाफेकीत तेजिंदर सिंग पालने भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं आहे. तर धावपटू अविनाश साबळेने ३००० मीटर स्टीपलचेजमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं आहे.
गोळाफेकीत दुसरं पदक...
भारताचा गोळाफेकपटू तजिंदर सिंग पालने २०.३६ मीटर लांब गोळा फेकत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. यापूर्वी २०१८ झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत देखील त्याने भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं होतं.
हे भारताचं या स्पर्धेतील १३ वं सुवर्णपदक ठरलं आहे. तर अॅथलेटिक्समधील दुसरं सुवर्णपदक ठरलं आहे. या पदकासह भारताची एकुण पदकाची संख्या ४५ वर जाऊन पोहोचली आहे.
यापूर्वी भारतीय गोळाफेकपटू किरण बालियानने १७.३६ मीटर लांब गोळा फेकून भारताला कांस्यपदक मिळवून दिलं आहे.
मेरठमध्ये राहणाऱ्या किरण बालियानने (Kiran Baliyan) पदक जिंकून ट्रॅक अँड फिल्ड इव्हेंटमध्ये आशिया चषक २०२३ स्पर्धेत भारताला पहिलं पदक जिंकून दिलं होतं. (Latest sports updates)
अविनाश साबळेने सुवर्णपदकावर कोरलं नाव..
महाराष्ट्राचा सुपुत्र अविनाश साबळेने ३००० मीटर स्टीपलचेज स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.
या पदकासह आशियाई क्रीडा स्पर्धेतील स्टीपलचेज इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय धावपटू ठरला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.