

भारताचा दिग्गज खेळाडू अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत अजिंक्य रहाणे याने निवृत्तीची घोषणा केली.
अजिंक्य रहाणेनं ८५ कसोटी सामन्यात ५ हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या १८८ इतकी राहिली आहे. त्याच्या नावावर १२ शतके आणि २६ अर्धशतके आहेत. वनडेमध्ये त्याने ८७ डावात २९६२ धावा केल्या आहेत. त्याने ३ शतके २४ अर्धशतके ठोकली आहेत. अजिंक्य रहाणे यांने २० टी२० मध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. २० डावात त्याला फक्त ३७५ धावाच करता आल्या, त्याच्या नावावर फक्त एका अर्धशतकाची नोंद आहे.
अजिंक्य रहाणेने त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली. या व्हिडीओसोबत रहाणेने लिहिले, "कॅप 278 आता निरोप घेत आहे. इतकी वर्षे दिलेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी मनापासून धन्यवाद. तुमचा मी कायम ऋणी राहीन."
गेल्या काही वर्षांपासून रहाणे टीम इंडियाच्या बाहेर होता. त्याने भारताकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2023 मध्ये खेळला होता. जुलै 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या टेस्ट सिरीजमध्ये तो शेवटचा भारतीय जर्सीत मैदानात उतरला होता. त्याआधी त्याने अखेरचा वनडे सामना 2018 मध्ये तर शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना 2016 मध्ये खेळला होता.
अजिंक्य रहाणेच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने भारतासाठी 85 टेस्ट, 90 वनडे आणि 20 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने 144 डावांमध्ये 38.46 च्या सरासरीने आणि 49.50 च्या स्ट्राइक रेटने 5,077 रन्स केले आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून 12 शतके आणि 26 अर्धशतके झळकली. कसोटीतील त्याची सर्वोच्च खेळी 188 धावांची होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.