Rohit Sharma vs Hardik Pandya: रोहितच्या फॅन्सकडून हार्दिकचा तिरस्कार का केला जातोय? माजी खेळाडूने सांगितलं खरं कारण

Adam Gilchrist On Hardik Pandya Captaincy: मुंबईचा कर्णधार बनल्यापासून हार्दिक पंड्याला ट्रोल केलं जात आहे. दरम्यान यामागचं नेमकं कारण काय? याबाबत माजी खेळाडूने भाष्य केलं आहे.
adam gilchrist on hardik pandya
Former australian cricketer adam gilchrist offered help to hardik pandya amd2000yandex

Adam Gilchrist On Hardik Pandya Captaincy:

हार्दिक पंड्याला आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्स संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला हवी तशी सुरुवात करता आलेली नाही. मुंबईने आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत आणि हे तिन्ही सामने मुंबईने गमावले आहेत. मुंबईच्या पराभवासाठी हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावर टीका केली जात आहे. या तिन्ही सामन्यांमध्ये हार्दिक पंड्याला बूइंग केलं गेलं आहे. हे पाहून दिग्गज खेळाडू देखील आश्चर्यचकीत झाले आहेत.

हार्दिकला का ट्रोल केलं जातंय?

ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू अॅडम गिलख्रिस्टने एका पॉडकास्टमध्ये बोलताना म्हटले की, ' मुंबईने हार्दिकला गुजरातकडून ट्रेड करुन आपल्या संघात घेणं आणि त्यानंतर रोहितला कर्णधारपदावरुन काढून त्याच्याकडे नेतृत्व देणं, या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या गोष्टी इतक्या जलद झाल्या की, कोणालाच कल्पना नव्हती. इथे त्याची लोकप्रियता अफाट आहे. हेच हार्दिक पंड्याविरोधात सुरु असलेल्या ट्रोलिंगचं मुख्य कारण असू शकतं.' (Cricket news in marathi)

adam gilchrist on hardik pandya
IPL 2024: मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी; मिस्टर ३६० सूर्या झाला फिट; कधी दिसणार मैदानात?

या पॉडकास्टमध्ये अॅडम गिलख्रिस्टने आपल्या पदार्पणावेळीचा एक किस्सा सांगितला. तो म्हणाला की, 'मी वनडेमध्ये इयान हीलीची जाा घेतल्यानंतर मला देखील बुइंगला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे मला कल्पना आहे की, हार्दिकला आता कसं वाटत असेल. जर मला संधी मिळाली तर मी त्याच्याकडे जाईन आणि त्याला मिठी मारेल.'

adam gilchrist on hardik pandya
Angkrish Raghuvanshi: टीम इंडियाच्या फ्लॉप खेळाडूने घडवला भविष्यातील स्टार फलंदाज! वाचा अंगक्रिश रघुवंशीची हटके स्टोरी

हार्दिक पंड्याने गेल्या २ हंगामात गुजरात टायटन्स संघाचं नेतृत्व केलं. या संघाचं नेतृत्व करताना त्याने २०२२ मध्ये संघाला चॅम्पियन बनवलं. तर २०२३ मध्ये झालेल्या हंगामात या संघाला फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. आयपीएल २०२४ स्पर्धेपूर्वी होणाऱ्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने १५ कोटी मोजत हार्दिक पंड्याला आपल्या संघात स्थान दिलं.

त्यानंतर रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढून ही जबाबदारी हार्दिक पंड्यार सोपवण्यात आली.मुंबई इंडियन्सने घेतलेला हा निर्णय फॅन्सला अजिबात पटला नव्हता. परिणामी मुंबई इंडियन्स संघाच्या सोशल मीडियावरील फॉलोवर्सची संख्या देखील कमी झाली होती. फॅन्सने निर्णयाचा जोरदार विरोध केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com