Angkrish Raghuvanshi: टीम इंडियाच्या फ्लॉप खेळाडूने घडवला भविष्यातील स्टार फलंदाज! वाचा अंगक्रिश रघुवंशीची हटके स्टोरी

Who Is Angkrish Raghuvanshi: हा खेळाडू आहे तरी कोण? आणि त्याला घडवण्यामागे कोणाचा हात आहे? हे तुम्हाला माहितेय का? जाणून घ्या अंगक्रिश रघुवंशीची स्टोरी.
angkrish raghuvanshi
former indian cricketer abhishek nayar helped angkrish raghuvanshi know the struggle story amd2000twitter
Published On

Angkrish Raghuvanshi Story:

कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात शानदार खेळ करत १०६ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात युवा फलंदाज अंगक्रिश रघुवंशीने कोलकाता नाईट रायडर्स संघाला दमदार सुरुवात करून दिली. त्याने अवघ्या २७ चेंडूत ५४ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार आणि ३ षटकार मारले. मात्र हा खेळाडू आहे तरी कोण? आणि त्याला घडवण्यामागे कोणाचा हात आहे? हे तुम्हाला माहितेय का? जाणून घ्या अंगक्रिश रघुवंशीची स्टोरी.

भारतीय संघासाठी केवळ ३ सामने खेळण्याची संधी मिळालेल्या अभिषेक नायरने अंगक्रिश रघुवंशीचं टॅलेंट ओळखलं आणि त्याला आकार दिला. अंगक्रिश रघुवंशीच्या वडिलांनी अभिषेक नायरचे आभार मानले.

angkrish raghuvanshi
IPL 2024: मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी; मिस्टर ३६० सूर्या झाला फिट; कधी दिसणार मैदानात?

ते म्हणाले की, ' आम्ही खरचं नशीबवान आहोत. आमचा मुलगा त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडला.' अभिषेक नायर सध्या कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी सहाय्यक प्रशिक्षकाची भूमिका पार पाडतोय. अंगक्रिश रघुवंशीने या शानदार खेळीचं श्रेय अभिषेक नायरला दिलं. अंगक्रिश रघुवंशीने आपल्या क्रिकेट प्रवासाची सुरुवात मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून खेळताना केली होती. इथेच त्याला अभिषेक नायरचं मार्गदर्शन लाभलं. (Cricket news in marathi)

angkrish raghuvanshi
IPL 2024 Point Table: कोलकाताच्या विजयानंतर पॉईंटटेबलमध्ये मोठा उलटफेर, KKRची पहिल्या स्थानावर झेप

या आक्रमक खेळीनंतर बोलताना अंगक्रिश रघुवंशी म्हणाला की, ' मी ही माझी खेळी अभिषेक नायर आणि माझ्या सपोर्ट स्टाफला समर्पित करेल. मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं आहे. अभिषेक नायर सर लहानपणापासूनच माझ्यावर मेहनत घेत आहेत.' अंगक्रिश रघुवंशीच्या आक्रमक खेळीमुळेच कोलकाता नाईट रायडर्सचा मोठी धावसंख्या उभारू शकला.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने २० षटकअखेर २७२ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाला १६६ धावा करता आल्या. हा सामना दिल्ली कॅपिटल्सला १०६ धावांनी गमवावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com