

Football News : फुटबॉल सामन्यादरम्यान एकमेकांना धक्का लागणे, पडणे, किरकोळ दुखापत होणे सामन्य गोष्ट आहे. अनेकदा खेळाडूंना गंभीर दुखापतही होते. नुकतीच एका सामन्यादरम्यान भयंकर दुर्घटना घडली आहे. एका खेळाडूचा पाय पडल्याने दुसऱ्या खेळाडूचा पाय मोडला आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
ब्यूनस आयर्समधील कोपा लिबर्टाडोरेस सामन्यादरम्यान अर्जेंटिना ज्युनियर्सच्या डिफेंडरचा डावा पाय मोडला आहे. ब्राझीलच्या फ्लुमिनेन्सकडून खेळणाऱ्या मार्सेलोचा धक्का लागल्याने 29 वर्षीय लुसियानो सांचेझला मंगळवारी गंभीर दुखापत झाली.
सामन्यात दरम्यान 56व्या मिनिटाला घडली. त्यानंतर संपूर्ण मैदानातील वातावरण चिंताजनक बनलं होत. प्रेक्षक आणि दोन्ही संघाचे खेळाडून घटनेमुळे तणावात दिसले. मार्सेलोला देखील घटनेनंतर अश्रून अनावर झाले. (Latest sports updates)
स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, डॉक्टरांनी सांगितलंती की, सांजेझला बरं व्हायला ८ ते १२ महिने लागतील. मैदानावरील घटना माझ्यासाठी खूप कठीण क्षण होता. कोणत्याही हेतूविना मी सहकारी फुटबॉलपटूला दुखापत केली. मी सांजेझला रिकव्हरीसाठी सदिच्छा देतो, असं मार्सेलोने म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.