
भारताने पाकिस्तानवर 6 विकेट्स राखून विजय मिळवला.
अभिषेक शर्माने 39 चेंडूत 74 धावा केल्या.
रऊफने ‘फायटर जेट’चा इशारा दिला, पण तो उलटला.
एशिया कप 2025 सुपर-4 मधील दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 172 रन्सचं लक्ष्य भारतासमोर ठेवलं होतं. हे आव्हान टीम इंडियाने अभिषेक शर्माच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर 6 विकेट्स राखून सहज पार केलं. दरम्यान या सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात शाब्दिक बाचाबाची पाहायला मिळाली.
पाकिस्तानी गोलंदाज शाहीन अफरीदी आणि हारिस रऊफ यांनी वारंवार अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलला त्रास देण्याचा आणि त्यांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय चाहत्यांनीही यावेळी आपल्या पद्धतीने प्रत्युत्तर दिलं. रऊफ बाऊंड्री लाईनजवळ उभं असताना प्रेक्षकांनी ‘कोहली-कोहली’ अशा घोषणा देऊन त्यांना सतत चिडवलं. त्यावर रऊफने ‘फायटर जेट’ दाखवण्याचा इशारा केला, पण तो इशारा त्यालाच महागात पडला.
दरम्यान चाहत्यांनी कोहलीचं नाव घेत रऊफला चिडवलं त्यावेळी त्याने विमानासारखे हातवारे करून प्रत्युत्तर दिलं. या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. भारतीय चाहत्यांनी त्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ची आठवण करून दिली. या कारवाईत भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानच्या अनेक तळांचा विध्वंस केला होता.
आपली फजिती लपवण्यासाठी आणि पाकिस्तानच्या जनतेला खुश करण्यासाठी हारिस रऊफने मैदानात 6-0 असा इशारा केला. त्याचा हेतू असा होता की, पाकिस्तानी सैन्याने भारताचे 6 राफेल विमान पाडले आहेत. पण प्रत्यक्षात मात्र त्याच्या गोलंदाजीवर अभिषेक शर्माने त्याला चांगलाच चोप दिलं.
रऊफच्या या वागण्याचा अभिषेक शर्मावर काहीही परिणाम झाला नाही. अभिषेकने अवघ्या 39 चेंडूत 74 रन्स केले. ज्यामध्ये 6 चौकार आणि 5 सिक्सचा समावेश होता. त्यांच्या आक्रमक फलंदाजीसमोर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी गुडघे टेकले.
अलीकडेच झालेल्या ऑपरेशन सिंदूर मोहिमेत भारताने पाकिस्तानचे 11 एअर बेस उद्ध्वस्त केले होते. तरीही पाकिस्तानचा दावा आहे की, त्यांनी भारताचे राफेल विमान पाडलं. पण जेव्हा त्यांच्याकडे पुरावे मागितले जातात, तेव्हा ते फक्त सोशल मीडियाचा हवाला देतात.
एशिया कप सुपर-4 मध्ये भारताचा विजय कोणावर झाला?
भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला.
अभिषेक शर्माने किती चेंडूंत 74 धावा केल्या?
अभिषेक शर्माने फक्त 39 चेंडूंत 74 धावा केल्या.
हारिस रऊफने मैदानात कोणता इशारा केला?
रऊफने 6-0 असा इशारा केला.
भारतीय चाहत्यांनी रऊफला कशाने चिथवले?
‘कोहली-कोहली’च्या घोषणांनी चाहत्यांनी रऊफला चिथवले.
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताने किती एअर बेस उद्ध्वस्त केले?
भारताने 11 एअर बेस उद्ध्वस्त केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.