
भारताने पाकिस्तानने दिलेलं १७२ धावांचं लक्ष्य गाठत सामना जिंकला
अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांच्यात १०५ धावांची भागीदारी
शुभमन गिल ४७ धावा करून बाद, सूर्यकुमार यादव शून्यावर माघारी
भारतीय संघाने चांगली कामगिरी करत सामना जिंकला
India vs Pakistan : आशिया कप स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये रोमहर्षक सामना झाला. आशिया कपमधील रोमांचक सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली. पाकिस्तानने दिलेल्या १७२ धावांचं आव्हान भारतीय फलंदाजांनी वादळी अंदाजात पार केलं. अभिषेक आणि गिलने धुव्वादारपणे खेळत प्रतिस्पर्ध्याला अक्षरशः धूळ चारली. टीम इंडियाच्या आक्रमक खेळीपुढे पाकिस्तानने शरणागती पत्कारली.
पाकिस्तानने दिलेल्या १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाच्या अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलने चांगली सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी रचली. शुभमन गिल २८ चेंडूत ४७ धावा करून बाद झाला. शुभमनला फहीमने बाद केलं. त्यानंतर उतरलेला भारताचा कर्णधार सूर्यकुमार शून्य धावांवर बाद झाला. सूर्यकुमारला हारिस राउफने बाद केलं.
१३ व्या षटकात भारताला तिसरा झटका बसला. अभिषेक शर्मा ७४ धावा करून बाद झाला. अभिषेकने डावात ५ धावा आणि ६ षटकार लगावले. या सामन्यात भारताने १८.५ षटकात ४ गडी गमावून १७४ धावा करत सामना जिंकला. भारताला विजय मिळवून देण्यात अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलने मोलाची कामगिरी केली.
कर्णधार सूर्यकुमारने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी उतरलेल्या पाकिस्तानला तिसऱ्या षटकात पहिला झटका बसला. फखर जमां ९ चेंडूत १५ धावा करून बाद झाला. सईम हा १७ चेंडूत २१ धावा करून बाद झाला. दोघे बाद झाल्यानंतर अयूब आणि फरहानने संघाचा डाव सावरला.
अयूब आणि फरहानने दुसऱ्या विकेटसाठी ४९ चेंडूत ७२ धावांची भागिदारी केली. पाकिस्तानने २० षटकात १७१ धावा कुटल्या. मात्र, पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत सामना जिंकला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.