India vs Pakistan: फक्त एका चेंडूनंतर थांबवण्यात आला होता सामना; कारण आलं समोर

India vs Pakistan Update : फक्त एका चेंडूनंतर भारत आणि पाकिस्तानचा सामना थांबवण्यात आला होता. सामना का थांबण्यात आला होता, त्याचं कारण समोर आलं आहे.
India vs Pakistan news
India vs Pakistansaamtv
Published On
Summary

भारत-पाकिस्तान सामना एका चेंडूनंतरच थांबवण्यात आला होता

फरहानने हाताला लागल्यानंतर फीजियोला बोलावून घेतलं

इरफान पठानने या प्रकारावर नाराजी व्यक्त केली

भारतीय संघात बुमराह आणि वरुण चक्रवर्तीला संधी

ind vs Pak : आशिया कप २०२५ च्या स्पर्धेच्या सुपर ४ राऊंडमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये रोमांचक सामना सुरु आहे. या सामन्यातील एका घटनेने चाहत्यांना मोठा धक्का बसला. भारत-पाकिस्तानचा सामना फक्त एका चेंडूनंतर थांबवण्यात आला होता. हार्दिक पंड्याने गोलंदाजी केली. मात्र, फरहानने पंड्याचा हार्ड लेन्थ चेंडू थांबवला. पण या चेंडूनंतर सामना थांबवण्यात आला. फरहानने पहिला चेंडू खेळल्यानतंर तातडीने पाकिस्तानी पव्हेलियनला आवाज दिला. त्यानंतर फीजियो धावत मैदानावर आले.

पाकिस्तानी सलामीवीर साहिबजादा फरहानला चेंडू लागला नाही, तरी त्याने फीजियोला मैदानात बोलावून घेतलं. त्याने हाताला टेपिंग करण्यासाठी बोलावून घेतलं. पंड्याचा चेंडू बॅटला लागल्यानंतर त्याच्या हाताला झटका बसला. त्यानंतर त्याने फीजियोला बोलावून घेतलं. फीजियोना तातडीने त्याच्या हाताला टेपिंग केली. त्यामुळे सामना दीड मिनिटांसाठी थांबवण्यात आला.

India vs Pakistan news
Ind Vs Pak : आधी टेन्शन वाढवलं, नंतर टीम इंडियानं डाव सावरला, पाकिस्तानकडून भारताला इतक्या धावांचं आव्हान

इरफान पठानने साहिबजादा फरहानच्या कृत्यावर टीका केली. इरफान पठानने म्हटलं की, 'साहिबजादा फरहानने फक्त एका चेंडूनंतर सामना थांबवला. त्याने हाताला आधीच टेपिंग ड्रेसिंग रूममधून करून यायला हवी होती. त्याने एका चेंडूनंतर वेळ खराब केला. इतक्या वेळेत एक ओव्हर झाली असती'.

India vs Pakistan news
Boyfriend Girlfriend : दोघात तिसरा...! तरुणाच्या आयुष्यात दुसरी तरुणी आली, प्रेमात अडथळा ठरलेल्या गर्लफ्रेंडला संपवलं

टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल पाहायला मिळाले. हर्षित राणा, अर्शदीप सिंहला बसवण्यात आलं. तर बुमराह आणि वरुण चक्रवर्तीला संघात स्थान देण्यात आलं. तर आजच्या सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com