England vs Bangladesh World Cup: आधी फलंदाजांनी चोपलं, नंतर गोलंदाजांनी रोखलं; गतविजेत्या इंग्लंडने विजयाचं खातं उघडलं

England vs Bangladesh World Cup: बांगलादेशला या सामन्यात विजयासाठी ३६५ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला अवघ्या २२७ धावा करता आल्या आहेत.
England vs Bangladesh World Cup:
England vs Bangladesh World Cup:Twitter
Published On: 

England vs Bangladesh World Cup:

वर्ल्डकप स्पर्धेत आज डबल हेडर सामन्यांचा थरार सुरू आहे. पहिला सामना गतविजेत्या इंग्लंड आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये पार पडला. धर्मशाळेच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने बांगलादेशला धुळ चारत वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत विजयाचं खातं उघडलं आहे. या सामन्यात इंग्लंडने १३७ धावांनी विजय मिळवला आहे. बांगलादेशला या सामन्यात विजयासाठी ३६५ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला अवघ्या २२७ धावा करता आल्या आहेत. (Latest Marathi News)

इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बांगलादेशची सुरुवात खराब झाली. बांगलादेशने ५० धावांच्या आत चार गडी गमावले. बांगलादेशचे चार गडी झटपट बाद झाल्याने संघावर दबाव वाढला. या बिकट परिस्थितीत रहीमने संघाची कमान सांभाळली.

इंग्लंडच्या आक्रमक गोलंदाजांपुढे बांगलादेशच्या फलंदाजांची जादू फारकाळ टिकली नाही. रहीम बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना बांगलादेशच्या फलंदाजांना करता आला नाही. 45 षटकाच्या आत बांगलादेशने ८ गडी गमावले.

England vs Bangladesh World Cup:
Pro Kabaddi Auction: प्रो कबड्डीच्या एका पर्वाचा अंत? राहुल चौधरी अन् रिशांक देवाडिगासह दिग्गज खेळाडू अनसोल्ड

इंग्लंड संघाच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे उर्वरीत दोन गडीही झटपट बाद झाले. इंग्लंडने बांगलादेशला २२७ धावांत गुंडाळले. इंग्लंडने तब्बल १३७ धावांनी बांग्लादेशवर विजय मिळवला आहे.

England vs Bangladesh World Cup:
Shubman Gill Replacement: BCCI ने शोधलीये शुभमन गिलची रिप्लेसमेंट! बाहेर झाल्यास या दोघांपैकी एकाला मिळू शकते संधी

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने ३९ चेंडूत अर्धशतक झळकावले. इंग्लंडच्या डेव्हिडने ९१ चेंडूत शतक ठोकलं. तर जो रूटनेही ४४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. इंग्लंडच्या फलंदाजांच्या दमदार खेळीमुळे बांगलादेशला तीनशे पार धावांचं आव्हान दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.