Ashes 2023: इंग्लंडला दुहेरी धक्का; विजेत्या ऑस्ट्रेलियावरही ICC ने केली मोठी कारवाई, नेमकं कारण काय?

2023 Ashes series Fine by ICC: या सामन्यानंतर आयसीसीने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांवर मोठी कारवाई केली आहे.
england and australia fined by icc
england and australia fined by iccsaam tv
Published On: 

England And Australia Team Fined By ICC: एजबस्टनच्या मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघामध्ये अॅशेस मालिकेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार कामगिरी करत २ गडी राखुन विजय मिळवला आहे. यासह ऑस्ट्रेलियाने या मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. दरम्यान या सामन्यानंतर आयसीसीने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांवर मोठी कारवाई केली आहे.

england and australia fined by icc
Emerging Asia Cup 2023: एकदम झक्कास...! टीम इंडियानं आशिया कप जिंकला, बांगलादेश संघाला लोळवलं

हा सामना झाल्यानंतर आयसीसीने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना मोठा धक्का दिला आहे. स्लो ओव्हर रेटमुळे विजेत्या ऑस्ट्रेलिया संघावर मॅच फिच्या ४० टक्के दंड आकारला गेला आहे. तर पराभूत झालेल्या इंग्लंडवर देखील मॅच फिच्या ४० टक्के दंड आकारला गेला आहे.

आयसीसीचे एलिट पॅनेलचे मॅच रेफ्री अॅंडी पायक्रॉफ्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही संघाकडून ठरलेल्या वेळेत २ षटके कमी टाकली गेली आहेत. त्यामुळेच दोन्ही संघावर ही कारवाई केली गेली आहे.

तसेच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आपली चुक मान्य केली आहे. त्यामुळे याबाबत अधिकृत घोषणा केली गेली नाही. इतकेच नव्हे तर स्लो ओव्हर रेटचा फटका गुणतालिकेवर झाल्याचे देखील झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

दोन्ही संघांना २ गुण गमवावे लागले आहेत. ही कारवाई झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ १० गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर इंग्लंडचा संघ -२ गुणांसह ९ व्या स्थानी आहे. (Latest sports updates in marathi)

england and australia fined by icc
Asia Cup 2023: आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची प्लेइंग ११ जाहीर! माजी कर्णधाराला मिळू शकते मोठी जबाबदारी

ऑस्ट्रेलियाच्या विजयात उस्मान ख्वाजाचे मोलाचे योगदान....

ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने दोन्ही डावात अप्रतिम फलंदाजी केली. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने १४१ तर दुसऱ्या डावात ६५ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याची प्लेअर ऑफ द मॅच म्हणून निवड करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.