Emerging Asia Cup 2023: एकदम झक्कास...! टीम इंडियानं आशिया कप जिंकला, बांगलादेश संघाला लोळवलं

Emerging Teams Asia Cup: भारतीय संघाने दमदार कामगिरी करत जेतेपदाला गवसणी घातली आहे
team india
team indiasaam tv
Published On

Asia Cup 2023: हाँगकाँग मधील टिन क्वांग रोड रिक्रिएशनच्या मैदानावर वुमेन्स इमर्जिंग एशिया कप स्पर्धेतील सामने पार पडले. या स्पर्धेत भारतीय महिला अ संघाने दमदार कामगिरी करत जेतेपदाला गवसणी घातली आहे. अंतिम सामन्यात भारतीय महिला अ संघाने बांगलादेश संघावर ३१ धावांनी विजय मिळवला आहे.

या सामन्यात भारतीय महिला अ संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ गडी बाद १२७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेश संघाचा डाव अवघ्या ९६ धावांवर संपुष्ठात आला आहे.

team india
Virat Kohli Net Worth: इंस्टाग्रामची एक पोस्ट करण्यासाठी विराटला मिळतात तब्बल 8.9 कोटी;वर्षाची कमाई ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय महिला अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या श्वेता सहरावत आणि उमा छेत्रीने चांगली सुरुवात करत २८ धावांची भागीदारी केली होती.

तर वृंदा दिनेशने ३६ आणि कनिका आहुजाने ३० धावांची बहुमुल्य खेळी केली. या दमदार खेळीच्या बळावर भारतीय महिला अ संघाने २० षटक अखेर ७ गडी बाद १२७ धावांपर्यंत मजल मारली. (Latest sports updates)

team india
Asia Cup 2023: आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची प्लेइंग ११ जाहीर! माजी कर्णधाराला मिळू शकते मोठी जबाबदारी

गोलंदाजीत श्रेयंका पाटील चमकली...

हा सामना जिंकण्यासाठी बांगलादेश महिला अ संघाला १२८ धावांची गरज होती. मात्र भारतीय संघाच्या दमदार गोलंदाजीसमोर बांगलादेश संघातील फलंदाज टिकुच शकले नाही. अवघ्या ५१ धावसंख्येवर बांगलादेशचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. १९.२ षटकात बांगलादेश महिला अ संघाचा संपुर्ण डाव अवघ्या ९६ धावांवर सपुंष्ठात आला.

या सामन्यात देखील श्रेयंका पाटीलने अप्रतिम गोलंदाजी केली. तिने ४ षटकात १३ धावा खर्च करत ४ गडी बाद केले. तसेच मन्नत कश्यपने ३ तर कनिका आहुजाने २ गडी बाद केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com