Virat Kohli Net Worth: इंस्टाग्रामची एक पोस्ट करण्यासाठी विराटला मिळतात तब्बल 8.9 कोटी;वर्षाची कमाई ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

Virat Kohli Instagram Post Charges: विराटला इंस्टाग्रामवर एक पोस्ट करण्यासाठी तब्बल ८.९ कोटी रुपये मिळतात.
virat kohli
virat kohlisaam tv
Published On

Virat Kohli's Social Media Post Charges: भारतात क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षक लाखोंच्या संख्येने मैदानात हजेरी लावत असतात. क्रिकेटप्रमाणेच क्रिकेटपटूंचा देखील मोठा चाहतावर्ग आहे.

वर्तमानात पाहिलं तर,भारताचा माजी कर्णधार विराट कोहली हा भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. हेच कारण आहे की, त्याचा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत समावेश आहे. विराटला इंस्टाग्रामवर एक पोस्ट करण्यासाठी तब्बल ८.९ कोटी रुपये मिळतात.

virat kohli
Virat Kohli Net Worth: विराट कोहली आहे कोट्यवधीच्या संपत्तीचा मालक, आकडा पाहून तुमचेही फिरतील डोळे

बंगळुरूतील स्टॉकग्रो कंपनीच्या अहवालानुसार, विराट कोहलीची नेट वर्थ १००० कोटी रुपये इतकी आहे. वर्तमानात त्याची एकूण नेट वर्थ १०५० कोटी रुपये असल्याचं म्हटलं गेलं आहे. यात अहवालात असं देखील म्हटलं गेलं आहे की, विराट कोहलीला इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्यासाठी तब्बल ८.९ कोटी रुपये मिळतात. तर ट्विटरवर ट्विट करण्यासाठी २.५ कोटी रुपये मिळतात.

विराटचा बीसीसीआयच्या A+ खेळाडूंच्या यादीत समावेश आहे. या करारानुसार त्याला वर्षाला ७ कोटी रुपये मिळतात. त्याला एक कसोटी सामना खेळण्यासाठी १५ लाख, वनडे सामना खेळण्यासाठी ३ लाख तर टी -२० सामना खेळण्यासाठी देखील ३ लाख रुपये मिळतात. (Latest sports updates)

virat kohli
Virat Kohli's First Car: डिझेल कार घेतली अन् भरलं पेट्रोल;वाचा विराटच्या पहिल्या कारचा भन्नाट किस्सा

स्टॉकग्रोच्या अहवालानुसार,विराटने स्टार्टअप्समध्ये देखील गुंतवणूक केली आहे. ब्लू ट्राईब्ज, युनिव्हर्सल स्पोर्ट्सबिज, एमपीएल,स्पोर्ट्स कॉन्वो सारख्या स्टार्टअप्सचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर तो १८ ब्रॅंड्ससोबत काम करतो. एका जाहीरातीच्या शुटसाठी तो ७.५० ते १० कोटी रूपये घेतो.

यासह विराट कोहलीच्या काही स्पोर्ट्स टीम देखील आहेत, ज्यात फुटबॉल, टेनिस आणि कुस्ती सारख्या खेळांचा समावेश आहे. विराटच्या घराबद्दल बोलायचं झालं, तर त्याचे मुंबईत आणि गुरूग्राममध्ये अलिशान घर आहे. त्याच्या मुंबईतील घराची किंमत ३४ कोटी रुपये तर गुरूग्राममध्ये असलेल्या घराची किंमत ८० कोटी रूपये इतकी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com