

वर्ल्डकप स्पर्धेत आज इंग्लंड आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. गतविजेत्या इंग्लंडने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. यापैकी एका सामन्यात इंग्लंडला विजय मिळवता आला आहे.
तर एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये इंग्लंडच्या गोलदाजांना हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. दरम्यान आज होणाऱ्या सामन्यात इंग्लंड संघात काही बदल पाहायला मिळू शकतात.
इंग्लंडचे गोलंदाज सातत्याने क्रिकेट खेळताय. त्यामुळे त्यांना विश्रांतीची गरज आहे. अफगाणिस्तानविरूद्ध होणाऱ्या सामन्यात कडवी झुंज पाहायला मिळणार नाही. त्यामुळे या सामन्यासाठी इंग्लंडच्या प्रमुख गोलंदाजांना विश्रांती दिली जाऊ शकते.
तर अफगाणिस्तानच्या गोलंदाजी आक्रमणात देखील ती धार पाहायला मिळालेली नाही. त्यामुळे अफगाणिस्तानच्या प्लेइंग ११ मध्ये देखील बदल पाहायला मिळू शकतात.
इंग्लंडच्या प्लेइंग ११ मध्ये होऊ शकतो बदल..
इंग्लंड संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सच्या पोटात दुखत असल्याने तो शुक्रवारी सराव सत्रात सहभाग घेऊ शकला नव्हता. त्यानंतर शनिवारी झालेल्या सराव सत्रात तो गोलंदाजी करताना दिसून आला होता.
अफगाणिस्तानविरूद्ध होणाऱ्या सामन्यात त्याला विश्रांती देऊन डेव्हिड विलीला संघात स्थान दिले जाऊ शकते. तसेच मार्क वुडला विश्रांती देऊन त्याच्याऐवजी गुस एटकिंसला संघात स्थान दिले जाऊ शकते. (Latest sports updates)
या सामन्यासाठी अशी असू शकते इंग्लंडची प्लेइंग ११:
जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार,विकेटकीपर), लियाम लिविंगस्टोन, सॅम करन, क्रिस वोक्स/डेविड विली, मार्क वूड/गुस एटकिंस, आदिल रशिद, रीस टॉप्ली.
या सामन्यासाठी अशी असू शकते अफगाणिस्तानची प्लेइंग ११:
रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम जादरान, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), अजमतुल्लाह ओरजई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला जादरान, राशिद खान, मुजीब उर रहमान/नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारूकी
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.