Rohit Sharma Records: नाद करा पण हिटमॅनचा कुठं! एकाच इनिंगमध्ये मोडून काढले हे मोठे रेकॉर्ड

India vs Pakistan: या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने मोठे रेकॉर्ड मोडून काठाले
rohit sharma
rohit sharmatwitter
Published On

Rohit Sharma Records:

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शनिवारी (१४ ऑक्टोबर) हिटमॅन शो पाहायला मिळाला. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी १९२ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने ८५ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान अनेक मोठ मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत.

वनडेत ३०० षटकार मारणारा पहिलाच भारतीय..

रोहित शर्मा वनडे क्रिकेटमध्ये ३०० षटकार मारणारा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. तर जगातील तिसरा फलंदाज ठरला आहे. रोहित शर्माने हा कारनामा २५४ व्या सामन्यात करून दाखवला आहे. तसेच वनडेत सर्वात जलद ३०० षटकार पूर्ण करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे.

rohit sharma
Rohit Sharma Record: सिक्स हिटिंग मशिन!अर्धशतकासह हिटमॅनने रचला इतिहास; वनडेत पूर्ण केली ट्रिपल सेंच्युरी

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत २०० धावा पूर्ण करणारा पहिलाच भारतीय..

रोहितने पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात ८५ धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत २०० धावा पूर्ण केल्या आहेत. यासह तो २०० धावा पूर्ण करणारा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे.

वनडेत धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक वेळेस ५० पेक्षा अधिक धावा करणारा फलंदाज...

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने ५८६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ६ वेळेस ५० पेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. (Latest sports updates)

rohit sharma
Ind vs Pak: हिटमॅनचा शो अन् टीम इंडियाचा दणदणीत विजय; पाकिस्तानला धूळ चारताच मिळाली गुड न्यूज

पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय कर्णधार..

रोहित शर्माने या डावात ६ गगनचुंबी षटकार मारले.यासह तो पाकिस्तानविरूद्ध सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. तसेच वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानविरूद्ध खेळताना एकाच सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे.

वर्ल्डकप स्पर्धेत धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक वेळेस ५० पेक्षा अधिक धावांची खेळी..

वर्ल्डकप स्पर्धेत धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. रोहित शर्माने ७ वेळेस हा कारनामा करून दाखवला आहे.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सर्वात मोठी खेळी करणारा भारतीय कर्णधार...

रोहित शर्माने या डावात ८५ धावांची खेळी केली. यासह तो वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सर्वात मोठी खेळी करणारा भारतीय कर्णधार ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com