Ind vs Pak: हिटमॅनचा शो अन् टीम इंडियाचा दणदणीत विजय; पाकिस्तानला धूळ चारताच मिळाली गुड न्यूज

Ind vs Pak: विश्वचषकातील १२ व्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ७ गडी राखून धूळ चारली आहे.
Ind vs Pak
Ind vs PakSaam tv
Published On

India vs Pakistan news:

विश्वचषकातील १२ व्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ७ गडी राखून धूळ चारली आहे. या स्पर्धेत भारताने सलग तिसरा विजय मिळाल्यानंतर भारतीयांना गुड न्यूज दिली आहे. या विजयामुळे टीम इंडिया गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचली आहे. या विजयामुळे टीम इंडियाने न्यूझीलंडला मागे टाकलं आहे. (Latest Marathi News)

टीम इंडियाने ऑस्टेलिया आणि आफगणिस्तानचा पराभव केल्यानंतर आज पाकिस्तानचा धुव्वा उडवला. टीम इंडियाने सलग तीन सामने जिंकत गुणतालिकेत मोठी आघाडी घेतली आहे.

Ind vs Pak
IND Vs PAK World Cup: 'कुंग फू' पांड्या झाला 'मांत्रिक' पांड्या; इमामच्या विकेट घेण्याआधी चेंडूसोबत पुटपुटला

भारताच्या पाच गोलंदाजांनी प्रत्येकी २-२ गडी बाद करून पाकिस्तानच्या सर्व खेळाडूंना बाद केलं. भारताच्या गोलंदाजांनी पाकिस्तानचे फलंदाजांना १९१ धावांत गुंडाळले. भारताचा कर्णधार रोहित शर्माने विजयात मोलाचा वाटा उचलला. रोहितने आजच्या सामन्यात ६ चौकार आणि ६ षटकार लगावले. ३०.३ षटकात टीम इंडियाने पाकिस्तानला पराभूत केलं.

टीम इंडियाने ६ गुण मिळवत विश्वचषकाच्या गुणतालिकेतील क्रमवारीत न्यूझीलंडला मागे टाकलं आहे. आता विश्वचषकाच्या गुणतालिकेत न्यूझीलंड दुसऱ्या आणि दक्षिण आफ्रिका संघ तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर पाकिस्तान चौथ्यावर स्थानावर आहे.

Ind vs Pak
Babar Azam Wicket: बाबरला अतिआत्मविश्वास नडला; सिराजला कट मारायला गेला अन् फसला, पाहा VIDEO

रोहित शर्माचा वादळी खेळी

पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. शुबमन गिल अवघ्या १६ धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली देखील १६ धावांवर बाद झाला. मात्र, दुसरीकडे रोहित शर्माने पाकिस्तानची धुलाई सुरु ठेवली.

रोहितने ६३ चेंडूत ८६ धावा केल्या. पुढे रोहित बाद झाल्यानंतर श्रेयस आणि केएल राहुलने भारताला विजय मिळवून दिला. विश्वचषकात टीम इंडियाने पाकिस्तानला तब्बल ८ वेळा पराभूत केलं आहे. विश्वचषकात पाकिस्तानला टीम इंडियाविरोधात एकही सामना जिंकला आला नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com