ICC CWC 2023: यंदाचा वर्ल्ड कप टीम इंडियाच जिंकणार! मात्र या २ संघांपासुन राहावं लागेल सावध

ODI WC 2023: २ असे संघ आहेत जे भारतीय संघाला वनडे वर्ल्ड कप जिंकण्यापासुन रोखु शकतात. कोणते आहेत ते २ संघ जाणुन घ्या.
team india
team indiasaam tv
Published On: 

Team India: यावर्षी भारतात वनडे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा ५ ऑक्टोबरपासुन सुरू होणार असुन अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. भारत - पाकिस्तान हे दोन्ही संघ १५ ऑक्टोबर रोजी आमने सामने येणार आहेत.

भारतीय संघाला वनडे वर्ल्ड कप जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. मात्र २ असे संघ आहेत जे भारतीय संघाला वनडे वर्ल्ड कप जिंकण्यापासुन रोखु शकतात. कोणते आहेत ते २ संघ जाणुन घ्या.

team india
Team India: 'पैसे कमावणं म्हणजेच सर्व काही नसतं..' वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूची BCCI च्या कारभारावर जोरदार टीका..

१) इंग्लंड :

इंग्लंड संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मजबुत संघांपैकी एक आहे. २०१९ मध्ये झालेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडने अंतिम सामन्यात न्युझिलंड संघाचा धुव्वा उडवत जेतेपदाला गवसणी घातली होती.

या संघामध्ये टॉप ऑर्डरपासुन ते लोवर ऑर्डर पर्यंत एकापेक्षा एक धाकड खेळाडू आहेत. हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स, जोस बटलर आणि जॉनी बेअरस्टो सारखे फलंदाज कुठल्याही क्षणी फलंदाजीला येऊन सामना बदलु शकतात. भारतीय संघाला जर २०२३ चा वनडे वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर नक्कीच इंग्लंड संघाकडुन सावध राहावं लागणार आहे. (Latest sports updates)

team india
Asia Cup 2023: आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची प्लेइंग ११ जाहीर! माजी कर्णधाराला मिळू शकते मोठी जबाबदारी

२) ऑस्ट्रेलिया:

ऑस्ट्रेलियाने तब्बल ५ वेळेस जेतेपदाला गवसणी घातली आहे. या संघाने १९८७, १९९९, २००३, २००७ आणि २०१५ मध्ये झालेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घातली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडुन देखील भारतीय संघाला सावध राहावं लागणार आहे. ऑस्ट्रेलिया संघ सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे.

या संघाने आयसीसी टी-२० २०२१ वर्ल्ड कप स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घातली होती. तसेच नुकताच पार पडलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात देखील ऑस्ट्रेलियाने दमदार कामगिरी केली होती. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा दारूण पराभव केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.