World Cup 2023 E- Tickets: वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचं ई -तिकीट मिळणार नाही! जय शाह यांची मोठी घोषणा;जाणून घ्या कसं मिळवायचं तिकीट

Jay Shah Statement On E- Tickets: बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सामन्यांच्या तिकिटांबाबत मोठी घोषणा केली आहे.
icc odi world cup 2023
icc odi world cup 2023saam tv
Published On: 

ICC World Cup 2023 E- Tickets Booking: भारतात यावर्षी आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. काही दिवसांपूर्वीच या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर होताच क्रिकेट चाहते सामन्याच्या तिकिटांची आतुरतेने वाट पाहताना दिसून येत आहे.

दरम्यान आता बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सामन्यांच्या तिकिटांबाबत मोठी घोषणा केली आहे.

icc odi world cup 2023
IND vs WI 2nd ODI Playing 11: दुसऱ्या वनडेत टीम इंडियाची ओपनिंग जोडी बदलणार? रोहितसोबत हा खेळाडू उतरणार मैदानात; पाहा प्लेइंग ११

ई -तिकीट मिळणार नाही..

आयसीसी वनडे वर्ल्डकप ही जगातील सर्वात मोठी स्पर्धा आहे. ही स्पर्धा पाहण्यासाठी जगभरातील प्रेक्षक गर्दी करू शकतात. त्यामुळे होणारी गडबड टाळण्यासाठी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

या स्पर्धेचे ई -तिकीट मिळणार नसल्याची माहिती जय शाह यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे. आयपीएल २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी ई -तिकीट उपलब्द करून देण्यात आले होते.

मात्र त्यावेळी स्टेडियमच्या बाहेर गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले होते. हा गोंधळ पुन्हा होऊ नये म्हणून बीसीसीआय खबरदारी घेण्याच्या प्रयत्नात आहे.

कसं मिळवायचं तिकीट?

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार जय शाह यांनी म्हटले की, 'आगामी वर्ल्डकप स्पर्धेसाठी ई -तिकीट उपलब्ध नसतील. मात्र आम्ही फिजिकल तिकिट्स उपलब्ध करून देऊ. फिजिकल तिकिट्स सामन्याच्या ७ ते ८ दिवसांपूर्वी उपलब्ध करून दिली जातील. मोठ्या ठिकाणी ई -तिकीट उपलब्ध करून देणं कठीण जातं.' (Latest sports updates)

icc odi world cup 2023
IND vs WI: कुलदीप-जड्डूची जोडी चमकली! पहिल्याच सामन्यात 'या' मोठ्या विक्रमाला घातली गवसणी

वर्ल्डकप स्पर्धेचे वेळापत्रक बदलणार?

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचे वेळापत्रक समोर येताच, भारत आणि पाकिस्तान सामन्याची तारीख समोर आली आहे. हा बहुप्रतीक्षित सामना ठरलेल्या वेळापत्रकानुसार येत्या १५ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. मात्र या सामन्याच्या तारखेत बदल केला जाऊ शकतो. कारण या सामन्यावेळी नवरात्रीचा पहिला दिवस असणार आहे.

हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित करण्यात आला आहे. अहमदाबादमध्ये या दिवशी प्रचंड गर्दी असेल. तसेच पोलीस अधिकारी देखील सुरक्षेत व्यस्त असतील, त्यामुळे हा सामना १४ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार अशी चर्चा सुरु आहे.

मात्र यादिवशी डबल हेडर सामने रंगणार आहेत. हे पाहता ट्रिपल हेडर सामन्याचे आयोजन केले जाऊ शकत नाही. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.