Dhruv Jurel Catch: फ्लाईंग जुरेल! विकेटच्या मागे घेतला भन्नाट कॅच- VIDEO

Duleep Trophy 2024, Dhruv Jurel Catch Video: दुलीप ट्रॉफी स्पर्धेत ध्रुव जुरेलने भन्नाट कॅच घेतला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय .
Dhruv Jurel Catch: फ्लाईंग जुरेल! विकेटच्या मागे घेतला भन्नाट कॅच- VIDEO
dhruv jurel catchtwitter
Published On

दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेला आजपासून (५ सप्टेंबर) सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील पहिल्या दिवशी इंडिया ए आणि इंडिया बी तर दुसरीकडे इंडिया सी आणि इंडिया सी या दोन्ही संघांमध्ये सामना सुरु आहे. इंडिया ए आणि इंडिया बी या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेला सामना बंगळुरुच्या मैदानावर सुरु आहे.

या सामन्यात शुभमन गिलने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या सामन्यात ध्रुव जुरेलने (Dhruv Jurel Catch) शानदार कॅच घेतला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ध्रुव जुरेलचा शानदार कॅच घेतला आहे. या सामन्यात इंडिया बी कडून अभिमन्यू ईश्वरन आणि यशस्वी जयस्वाल दोघेही डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर आले होते. दोघांनी संघाला शानदार सुरुवात करुन दिली. मात्र कव्हर ड्राईव्ह मारण्याच्या नादात ईश्वरनला बाद होऊन माघारी परतावं लागलं आहे.

तर झाले असे की, आवेश खानने टाकलेल्या चेंडूवर, अभिमन्यू ईश्वरनने कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चेंडू बॅटचा कडा घेत पहिल्या स्लिपच्या दिशेने वेगाने जात होता. केएल राहुल पहिल्या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत होता.

Dhruv Jurel Catch: फ्लाईंग जुरेल! विकेटच्या मागे घेतला भन्नाट कॅच- VIDEO
आजपासून Duleep Trophy ला सुरुवात! केव्हा अन् कुठे पाहता येणार लाईव्ह?

त्यावेळी यष्टीरक्षण करत असलेल्या ध्रुव जुरेलने उजव्या बाजुला डाईव्ह मारली आणि एका हाताने शानदार कॅच घेतला. ईश्वरनचा डाव ४२ चेंडूंवर अवघ्या १२ धावांवर आटोपला. मात्र ध्रुव जुरेलने पकडलेल्या कॅचची जोरदार चर्चा सुरु आहे. या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Dhruv Jurel Catch: फ्लाईंग जुरेल! विकेटच्या मागे घेतला भन्नाट कॅच- VIDEO
Duleep Trophy 2024: स्टार खेळाडूचा फ्लॉप शो सुरुच, टीम इंडियात संधी मिळणं कठीण

असे आहेत दोन्ही संघ:

इंडिया अ संघ:

मयंक अग्रवाल, शाश्वत रावत, शुभमन गिल, तिलक वर्मा, रियान पराग, शिवम दुबे, तनुष कोटियन, ध्रुव जुरेल, के.एल. राहुल, कुमार कुशाग्र, आकाश दीप, आवेश खान, खलील अहमद, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, विद्वत कावेरीप्पा.

इंडिया बी संघ:

अभिमन्यू ईश्वरन, सरफराज खान, यशस्वी जयस्वाल, के. नितीश कुमार रेड्डी, मुशीर खान, वॉशिंग्टन सुंदर, नारायण जगदीसन, ऋषभ पंत, मोहित अवस्थी, मुकेश कुमार, नवदीप सैनी, राहुल चहर, साई किशोर, यश दयाल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com