
आयपीएलमध्ये रविवारी डबल हेडर खेळवण्यात आले होते. यामध्ये दुसरा सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबईचा ४ विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने १५५ रन्स केले. या सामन्याने मुंबईचे फलंदाज सपशेल फेल ठरले. यावेळी मुंबई इंडियन्सच्या पराभवाची प्रमुख कारणे कोणती होती ती जाणून घेऊयात.
टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात खूपच खराब झाली. अनुभवी फलंदाज रोहित शर्मा शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. दुसरा ओपनर रायन रिकेलटन देखील १३ रन्सवर आऊट झाला. मुंबई इंडियन्सच्या एकाही फलंदाजाने चांगली कामगिरी केली नाही. मुंबईकडून सर्वाधिक धावा तिलक वर्माने केल्या . त्याने ३१ रन्स केले असून कर्णधार सूर्यकुमारने २९ रन्सची खेळी केली. दीपक चहरने शेवटी २८ रन्स जोडल्याने टीमचा स्कोर १५० पार झाला.
ऋतुराज आणि रचिन रविंद्र यांच्यातील ६७ रन्सच्या पार्टनरशिपने चेन्नईला मजबूत स्थितीत आणलं होतं. पण रोहित शर्माच्या जागी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या विघ्नेश पुथूरने त्याच्या डेब्यू सामन्यातच शानदार गोलंदाजी केली. ऋतुराज ५६ रन्सवर आणि त्यानंतर शिवम दुबेला ९ रन्सवर बाद करत मुंबईची गाडी पुन्हा रूळावर आणली. यानंतर त्याने दीपक हुड्डाच्या रूपात तिसरा बळी घेतला. त्याने ३ ओव्हर्समध्ये ३ विकेट्स घेतले होते. पण सूर्यकुमार यादवने चौथी ओव्हर दिली नाही. कदाचित ही सूर्याची मोठी चूक होती.
मुंबई इंडियन्स टीमच्या प्लेइंग ११ मध्ये समाविष्ट असलेले चारही परदेशी खेळाडू अपयशी ठरलेले दिसले. रायन रिकेल्टनने १३ आणि विल जॅक्सने ११ रन्स केले. त्यामुळे हे दोन्ही फलंदाज फेल गेल्याचं ठरलं. गोलंदाजीमध्येही ट्रेंट बोल्टने ३ ओव्हर्समध्ये २७ रन्स दिले आणि एकही विकेट घेतली नाही. याशिवाय मिचेल सँटनरने २.१ ओव्हर्स फेकली टाकली आणि २४ रन्स दिले. त्यालाही एकही विकेट मिळाली नाही.
पहिल्या पराभवानंतर सूर्यकुमारने कबूल केलं की जर फलंदाजांनी आणखी १५-२० रन्स अधिक केले असते तर कदाचित निकाल त्यांच्या बाजूने लागला असता. पराभवानंतर सूर्य म्हणाला, 'आम्ही १५-२० धावा मागे होतो, पण खेळाडूंनी सामन्यासाठी जो संघर्ष केला तो महत्त्वपूर्ण होता. एमआय टीम यासाठीच ओळखली जाते की, तरुणांना संधी देणं. याचचं एक चांगलं उदाहरण म्हणजे विघ्नेश. त्याला १८ वी ओव्हर देणं ही काही मोठी गोष्ट नव्हती. त्यावेळी दव देखील नव्हतं. दुसऱ्या डावात ऋतुराजने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्यामुळे त्याने सामना आमच्याकडून हिरावून घेतला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.