Shocking : मोठी बातमी! भारतीय खेळाडूला अटक; धक्कादायक कारण समोर

Indian Para Swimmer Mohammad Shams Alam Sheikh News : जपानमधील नागोया येथील हॉटेलमध्ये भारतीय पॅरा जलतरणपटू मोहम्मद शम्स आलम शेख याच्यावर महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाचा आरोप.
 indian para swimmer mohammad shams alam sheikh
indian para swimmer mohammad shams alam sheikhAI Image
Published On: 
Summary
  • भारतीय पॅरा जलतरणपटू मोहम्मद शम्स आलम शेखला अटक

  • जपानमध्ये महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाचा आरोप

  • नागोया येथील फोर पॉइंट्स बाय शेराटन हॉटेलमध्ये घडली घटना

  • पोलिसांचा पुढील तपास सुरु

जपानमध्ये सध्या आशियाई पॅरा गेम्स सुरु आहेत. या गेम्सदरम्यान धक्कादायक घटना घडली आहे. भारतातील एका जलतरण खेळाडूने हाऊसकिपींग करणाऱ्या महिलेसोबत गैरकृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी या खेळाडूवर गुन्हा दाखल करून त्याला भारतात पुन्हा पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे. मोहम्मद शम्स आलम शेख असे या आरोपी खेळाडूचे नाव आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना नागोया येथील फोर पॉइंट्स बाय शेराटन हॉटेलमध्ये घडली. भारतीय पॅरा जलतरण संघाचे खेळाडू या हॉटेलमध्ये राहत होते. या दरम्यान हॉटेलच्या एका खोलीत हाऊसकीपिंगसाठी एक महिला कर्मचारी गेली होती. खोलीत गेल्यानंतर संबंधित खेळाडूने तिच्या अंगाला हात लावत तिचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 indian para swimmer mohammad shams alam sheikh
Potato Peels : बटाटा सोलून साली फेकून देता? 'असा' करा वापर, ८ दिवसांत दिसेल चमत्कार

एका भारतीय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महिला कर्मचाऱ्याने या घटनेची माहिती आपल्या वरिष्ठांना दिल्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी संबंधित खेळाडूला चौकशीसाठी ताब्यात घेतले. या प्रकरणात अयोग्य स्पर्श, अश्लील हावभाव आणि जबरदस्ती लैंगिक छळ केल्याचे आरोप करण्यात आल्याचे वृत्त आहे.

 indian para swimmer mohammad shams alam sheikh
Weather Update : राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस, 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

घटनेची माहिती स्थानिक आयोजन समितीने भारतीय पथकाच्या प्रमुख अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी भारतीय पथकाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक प्रशासनाशी चर्चा केली. तसेच संबंधित महिला कर्मचाऱ्याची लेखी माफी मागायला सांगितली आणि आरोपी खेळाडूला जपानमधून परत पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यानुसार, शेखला दुसऱ्या हॉटेलमध्ये हलवण्यात आले आणि मंगळवारी त्याच्या भारतात परतीची व्यवस्था करण्यात आली. दरम्यान, या घटनेची गंभीर दखल भारतीय पॅरालिम्पिक समिती घेण्याची शक्यता आहे. संबंधित खेळाडूवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यासह आजीवन बंदी घालण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे वृत्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com