Rohit Sharma : मोठी अपडेट! गुजरात टायटन्सची ताकद वाढली; रोहित शर्मा संघासाठी निभावणार महत्वाची जबाबदारी

rohit Sharma Latest news : आयपीएलची मोठी अपडेट हाती आली आहे. गुजरात टायटन्सची ताकद वाढली आहे. रोहित शर्मा संघासाठी महत्वाची जबाबदारी निभावणार आहे.
gujarat titans
gujarat titans squad 2025Saam tv
Published On

आयपीएल २०२५ चा पहिला सामना २२ मार्च रोजी कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉय चॅलेंजर्स बेंगळुरुदरम्यान होणार आहे. आयपीएलसाठी सर्व संघाने जोरदार तयारी सुरु केली आहे. आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्स देखील नशीब आजमावणार आहे. गुजरात टायटन्सने खेळाडूंसहित कोचिंग स्टाफवर देखील विशेष लक्ष दिलं आहे. यंदा गुजरात टायटन्सने १८ व्या सीजनसाठी कोचिंग स्टाफमध्ये रोहित शर्माचा समावेश केला आहे. गुजरात टायटन्सकडून रोहित शर्मावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

gujarat titans
IPL 2025 सुरु होण्याआधी बीसीसीआयने बदलले 'हे' नियम

तुम्ही रोहित शर्माचं नाव वाचून चकीत झाला असेल. परंतु आम्ही हिटमॅनविषयी सांगत नाही. रोहित शर्मा नावाचे भारतीय दिव्यांग संघाचे फिल्डिंग कोच आहेत. ते आयपीएलमध्ये गुजरात टायटन्ससाठी साइड आर्म थ्रोअरची भूमिका निभावणार आहेत. क्रिकेटमध्ये साईड आर्म थ्रोअरची भूमिका अत्यंत महत्त्वाची झाली आहे. यामुळे फलंदाजांना वेगवान गोलंदाजीचा सराव करण्यास मदत करते. तसेच फलंदाजांना त्यांच्या प्रतिसाद वेळेत सुधारणा होते. रोहित शर्माच्या या नियुक्तीमुळे गुजरात टायटन्स संघाती सराव सत्रांची गुणवत्ता वाढणार आहे. तसेच फलंदाजांना अधिक चांगली तयारी करता येईल.

gujarat titans
IPL 2025 : नशीब असावे तर असे... टीम इंडियातून बाहेर, ऑक्शनमध्ये अनसोल्ड; आता आयपीएलमध्ये करणार धमाकेदार एन्ट्री

आयपीएल २०२५ मध्ये गुजरातचं नेतृत्व शुभमन गिल करणार आहे .गुजरात टायटन्स २५ मार्च रोजी पंजाब किंग्सविरोधात अहमदाबादमध्ये खेळणार आहे. गुजरातच्या संघाला हा मागील सीजनमध्ये प्लेऑफमध्येही स्थान मिळालं नव्हतं. यंदा गुजरातच्या संघाने टॉप ४ मध्ये पोहोचून चषक जिंकण्याने निश्चय केला आहे. संघात जोस बटलर, मोहम्मद सिराज आणि कगिसो रबाडाच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

gujarat titans
IPL मध्ये क्रिकेट खेळाडूंना चेंडूला लाळ लावण्याची 'परवानगी'

कसा आहे गुजरात टायटन्सचा स्कॉड?

शुभमन गिल (कर्णधार), रशिद खान, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, शाहरुख खान, कगिसो रबाडा, जोस बटलर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, निशांत सिंधु, महिपाल लोमरोर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, मानव सुथर, वाशिंगटन सुंदर, गेराल्ड कोएत्जी, अरशद खान, गुरनूर बरार, शेरफेन रदरफोर्ड, आर. साई. किशोर, इशांत शर्मा, जयंत यादव, ग्लेन फिलिप्स, करीम जनत, कुलवंत खेजरोलिया

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com