Rohit Sharma: ये सरक.. भारतात येताच रोहित शर्मा भडकला; विमानतळावर असं काय घडलं? VIDEO

Rohit Sharma Gets Angry: रोहित शर्मा विश्रांतीसाठी सहकुटुंब मालदीवला गेला होता. दरम्यान मायदेशात येताच रोहित भडकल्याचे पाहायला मिळाले आहे.
Rohit Sharma: ये सरक.. भारतात येताच रोहित शर्मा भडकला; विमानतळावर असं काय घडलं? VIDEO
rohit sharmainstagram
Published On

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा विश्रांती करण्यासाठी मालदीवला गेला होता. आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत असल्याचे फोटो त्याने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले होते. दरम्यान २२ मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी तो मायदेशात परतला आहे. रोहित आपल्या कुटुंबासह भारतात परतला आहे. दरम्यान एयरपोर्टवर तो फोटो घेणाऱ्यांवर भडकल्याचे पाहायला मिळाले आहे.

Rohit Sharma: ये सरक.. भारतात येताच रोहित शर्मा भडकला; विमानतळावर असं काय घडलं? VIDEO
IPL 2025: लखनऊची ताकद दुपटीने वाढणार! स्टार खेळाडू कमबॅकसाठी सज्ज

रोहित एअरपोर्टवर भडकला..

सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात रोहित एअरपोर्टवर असल्याचं दिसून येत आहे. यादरम्यान तो पॅपाराजीवर भडकताना दिसून येत आहे. रोहित आपल्या कुटुंबासह मुंबई विमानतळावर आला, त्यावेळी पॅपाराजींनी समायराचा फोटो घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी रोहित भडकताना दिसून आला. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रोहित आपल्या लेकीला कारच्या दिशेने घेऊन जाताना दिसून येत आहे.

Rohit Sharma: ये सरक.. भारतात येताच रोहित शर्मा भडकला; विमानतळावर असं काय घडलं? VIDEO
IND vs NZ: टीम इंडिया तर मालामाल पण न्यूझीलंडवरही पैशांचा पाऊस; पाहा दोन्ही संघांना किती मिळाली प्राईज मनी

रोहित ज्यावेळी विमानतळावर आला, त्यावेळी विमानतळावर प्रचंड गर्दी होती. त्याने क्षणही न दवडता समायराला कारमध्ये बसवलं. सर्वकाही शांत होताच रोहितही शांत झाला. त्यानंतर रोहितने फोटोसाठी पोझ दिला. मात्र पॅपाराजींची फोटो घेण्यासाठीची धडपड पाहून तो भडकला होता.

मुंबई इंडियन्सकडून खेळणार

गेली काही वर्ष रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाचं नेतृ्त्व करताना दिसून आला होता. रोहितच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्सने ५ वेळेस आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. त्यानंतर गेल्या हंगामात मुंबई इंडियन्सने रोहितला कर्णधारपदावरुन काढून ही जबाबदारी हार्दिक पंड्यावर सोपवली होती. हा निर्णय कोणालाच पटला नव्हता.

त्यामुळे हार्दिकला हुटींगचा सामना करावा लागला होता. याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर पाहायला मिळाला होता. मुंबईचा संघ गेल्या हंगामात प्लेऑफमध्येही प्रवेश करु शकला नव्हता. मात्र टी-२० वर्ल्डकप स्पर्धा जिंकल्यानंतर हार्दिक पंड्याचही क्रेझ वाढली आहे. या हंगामात फॅन्स त्याला सपोर्ट करताना दिसून येऊ शकतात. तर रोहित सलामीला फलंदाजी करताना दिसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com