

भारतीय संघ येत्या १४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरूद्ध भिडणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यानंतर भारतीय संघ बांगलादेशविरूद्ध दोन हात करताना दिसून येणार आहे.
हा सामना १९ नोव्हेंबर रोजी पुण्यात रंगणार आहे. या सामन्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आजपासून या दोन्ही सामन्यांसाठीची तिकिटं विक्रिसाठी काढली जाणार आहेत .
चेन्नईच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना खेळवला गेला होता. या सामन्यादरम्यान स्टेडियममधील खुर्च्या रिकाम्या असल्याचं दिसून आलं होतं. मात्र बुकिंग अॅपवर तिकिटं विकली गेली असल्याचं दिसून आलं होतं.
आता पुढील २ सामन्यांसाठी बीसीआयने खास तयारी केली आहे. क्रिकेट चाहते हे तिकीट Book My Show App किंवा आयसीसीच्या अधिकृत साईटवर जाऊन देखील बुक करू शकता.
भारत विरूद्ध पाकिस्तान आणि भारत विरूद्ध बांगलादेश या सामन्याची तिकीट विक्री आज रात्री ८ पासून सुरू होणार आहे. भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यात होणारा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.
या सामन्याचं तिकीट मिळवण्यासाठी क्रिकेट चाहत्यांना २ हजार रूपये खर्च करावे लागणार आहेत. तर पुण्यात होणाऱ्या भारत विरूद्ध बांगलादेशविरूद्धच्या सामन्याचं तिकीट मिळवण्यासाठी क्रिकेट चाहत्यांना १२०० रूपये खर्च करावे लागणार आहेत. (Latest sports updates)
भारतीय संघाचा वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरूद्ध रंगणार आहे.चेन्नईच्या चेपॉकवर रंगलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डाव १९९ धावांवर संपु्ष्टात आला होता. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ६ गडी राखून विजय मिळवला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.