IND vs AFG, Playing XI: अश्विन की शार्दुल? गिलऐवजी कोणाला मिळणार संधी? पाहा आज होणाऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग ११

India vs Afghanistan Playing 11 Prediction: पाहा या सामन्यासाठी कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११.
India vs Afghanistan playing 11 ind vs afg playing 11 shardul thakur r ashwin mohammed shami shubman gill sports news in marathi
India vs Afghanistan playing 11 ind vs afg playing 11 shardul thakur r ashwin mohammed shami shubman gill sports news in marathisaam tv
Published On

India vs Afghanistan Playing 11 Prediction:

वर्ल्डकपचा पहिला पेपर पास करून भारताचा संघ दुसरा सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघाचा दुसरा सामना अफगाणिस्तान संघाविरुद्ध रंगणार आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय संघात काही मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

भारतीय संघाचा पहिला सामना चेन्नईच्या मैदानावर झाला होता. चेन्नईची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. तर याउलट दिल्लीच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. त्यामुळे या सामन्यासाठी शार्दुल ठाकूरचा संघात समावेश केला जाऊ शकतो.

चेन्नईच्या मैदानावर झालेल्या भारतीय संघ आर अश्विन, कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा या फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरला होता. फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर असणाऱ्या खेळपट्टीवर ही रणनीती यशस्वी ठरली होती.

India vs Afghanistan playing 11 ind vs afg playing 11 shardul thakur r ashwin mohammed shami shubman gill sports news in marathi
IND vs AFG: टीम इंडियाला दिलासा देणारी बातमी! अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यापूर्वी दिल्लीतून समोर आली मोठी अपडेट

दिल्लीच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना हवी तितकी मदत मिळणार नाही. त्यामुळे वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूचा संघात समावेश केला जाऊ शकतो. आर अश्विनऐवजी शार्दुल ठाकूर किंवा मोहम्मद शमीचा प्लेइंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो.

शार्दुल ठाकुरला संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे कारण तो गोलंदाजीसह फलंदाजीतही मोलाचं योगदान देऊ शकतो. (Latest sports updates)

India vs Afghanistan playing 11 ind vs afg playing 11 shardul thakur r ashwin mohammed shami shubman gill sports news in marathi
Funny Cricket Video: कॅमेरामॅन जल्दी फोकस करो..मोठ्या स्क्रीनवर स्वत:ला पाहुन सूर्याचा घासच अडकला!मजेशीर VIDEO व्हायरल

शुभमन गिल खेळणार का?

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात शुभमन गिल खेळताना दिसून आला नव्हता. त्याला डेंग्यूची लागण झाली आहे. आता अफगाणिस्तानविरूद्ध होणाऱ्या सामन्यातूनही तो बाहेर राहणार आहे. त्याच्याऐवजी ईशान किशन डावाची सुरूवात करताना दिसून येऊ शकतो.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर/आर अश्विन, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

अशी असू शकते अफगाणिस्तानची प्लेइंग ११:

रहमानुल्लाह गुरबाज़ (यष्टीरक्षक), इब्राहिम जादरान, रहमत शाह, हश्मतुल्लाह शाहीदी (कर्णधार), मोहम्मद नबी, नजीबुल्ला जादरान,अजमतुल्ला ओमरजई, राशिद खान, नवीन उल-हक, मुजीब उर रहमान आणि फजलहक़ फारुकी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com