वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील भारताचा दुसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यापूर्वी जाणून घ्या कसं असेल दिल्लीतील हवामान.
दिल्लीत सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार सामन्यावेळी पाऊस पडणार नाही. ढगाळ वातावरण असल्याने सामन्याची रंगत आणखी वाढेल. कारण यामुळे वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल.
तापमानाबद्दल बोलायचं झालं तर, पारा चढलेला असेल. दिवसातील तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतं. तर संध्याकाळच्या वेळी हे तापमान २७ अंश सेल्सिअसपर्यंत येऊ शकतं.
दिल्लीत धावांचा पाऊस...
वर्ल्डकप स्पर्धेतील हा सामना अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार आहे. यापूर्वी याच मैदानावर श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात पाऊस तर नाही आला मात्र धावांचा जोरदार पाऊस पडला. या एकाच सामन्यात दोन्ही सगंघांकडून तब्बल ७५४ धावा कुटल्या गेल्या.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉक, वॅन डर डुसेन आणि एडन मार्करम या तिघांनी एकाच डावात शतकं ठोकली. यावरून हे स्पष्ट झालं आहे की, दिल्लीची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे भारतीय फलंदाज देखील या सामन्यात धावांचा पाऊस पाडताना दिसून येऊ शकतात. (Latest sports updates)
ऑस्ट्रेलियावर मिळवला शानदार विजय..
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली होती. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या १९९ धावांवर संपुष्टात आला होता. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ६ गडी राखून विजय मिळवला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.