PAK vs SL: भारतात आलं लंकेचं 'मेंडिस'वादळ!पाकिस्तानच्या गोलंदाजांना चोपत मोडला WC स्पर्धेतील मोठा रेकॉर्ड

Kusal Mendis Century: कुसल मेंडिसने शतक ठोकत मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. I
kusal mendis century
kusal mendis centurytwitter
Published On

Kusal Mendis Century:

वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरू आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय श्रीलंकेला सार्थ ठरवता आला नाही.

श्रीलंकेला या सामन्यात हवी तशी सुरुवात करता आली नाही. मात्र त्यानंतर कुसल मेंडिसने मोर्चा सांभाळला आणि अवघ्या ६५ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केलं. यादरम्यान त्याच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

या शतकी खेळीसह कुसल मेंडिस वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकेसाठी सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी माजी फलंदाज कुमार संगकाराने ७० चेंडूंचा सामना करत श्रीलंकेसाठी सर्वात वेगवान शतक झळकावले होते. हा कारनामा त्याने २०१५ वनडे वर्ल्डकप स्पर्धेत केला होता. आता कुसल मेंडिसने हा रेकॉर्ड मोडून काढला आहे. (Latest sports updates)

kusal mendis century
Trent Boult Catch: बाऊंड्रीवर ट्रेंट बोल्टचा भन्नाट कॅच! VIDEO पाहुन येईल ख्रिस लिनच्या कॅचची आठवण

कुसल मेंडिसला या सामन्यात मोठी खेळी करण्याची संधी होती मात्र त्याचा डाव १२२ धावांवर संपुष्टात आला. त्याने या खेळीदरम्यान १४ चौकार आणि ६ षटकार मारले. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने त्याला बाद करत माघारी धाडले.

या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पाकिस्तानी गोलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवत श्रीलंकेला सुरूवातीलाच मोठा धक्का दिला. कुसल परेरा शून्यावर बाद होऊन माघारी परतला.

kusal mendis century
World Cup 2023: पाकिस्तानी अँकर झैनब अब्बासने तडकाफडकी सोडला भारत! 9 वर्षांपूर्वीचं ट्वीट महागात पडलं

तर पथुम निसंकाने ६१ चेंडूंचा सामना करत ५१ धावांची खेळी केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कुसल मेंडिसने ७७ चेंडूंचा सामना करत १४ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने १२२ धावांची खेळी केली.

तर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या सदिरा समरविक्रमाने ८९ चेंडूंचा सामना करत ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०८ धावा चोपल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com