World Cup 2023: पाकिस्तानी अँकर झैनब अब्बासने तडकाफडकी सोडला भारत! 9 वर्षांपूर्वीचं ट्वीट महागात पडलं

Zainab Abbas News: पाकिस्तानी अँकरला तडकाफडकी भारत सोडावं लागलं आहे, काय आहे कारण जाणून घ्या.
ZainabAbbas
ZainabAbbastwitter
Published On

Zainab Abbas News:

पाकिस्तानी स्पोर्ट्स प्रेझेंटर झैनब अब्बासला वर्ल्डकप सुरू असतानाच भारत सोडावं लागलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झैनब अब्बासने ९ वर्षांपूर्वी भारताविरुद्ध २ ट्विट केले होते. या ट्विटमुळे आता नवीन वाद पेटला आहे.

काही वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, तिची भारतातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर काही वृत्तांमध्ये, ती स्वतःहून पाकिस्तानात परतली असं म्हटलं गेलं आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) ती वर्ल्डकप स्पर्धा कव्हर करण्यासाठी भारतात आली होती. आज होणाऱ्या पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामन्यात ती अँकरिंग करणार होती.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, वकील विनीत जिंदल यांनी झैनब अब्बासवर अँटी इंडिया ट्विट केल्यामुळे तक्रार दाखल केली होती. त्यांनी झैनब अब्बासवर भारत आणि हिंदूंचा अपमान केल्याचा आरोप केला होता.

ZainabAbbas
Trent Boult Catch: बाऊंड्रीवर ट्रेंट बोल्टचा भन्नाट कॅच! VIDEO पाहुन येईल ख्रिस लिनच्या कॅचची आठवण

विनीत जिंदल यांनी झैनब अब्बासने ९ वर्षांपूर्वी केलेल्या ट्विटचे स्क्रीनशॉट घेऊन तक्रार दाखल केली. हे ट्विट Zainablovesrk या नावाने करण्यात आले होते. या अकाऊंटचं नाव आता बदलून ZAbbas Official असं करण्यात आलं आहे.

ZainabAbbas
Sachin Tendulkar Tweet: IND vs AUS सामन्याच्या सुरुवातीलाच सचिनला बसला होता आश्चर्याचा धक्का! थरारक विजयानंतर केलेलं ट्वीट व्हायरल

देशातून काढण्याची मागणी..

विनीत जिंदल यांनी ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, 'BCCI आणि होम मिनिस्ट्रीला पत्र लिहून मी झैनब अब्बासला देशाबाहेर काढण्याची मागणी करतोय. 'अतिथि देवो भव..'त्यांच्यासाठीच आहे, जे आमच्या देशाचा आणि हिंदू धर्माचा आदर करतात. जे देशाचा आदर करत नाहीत त्यांचं आमच्या भूमीवर स्वागत व्हायला नको.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com