भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना धरमशालेच्या मैदानावर रंगणार आहे. भारतीय संघाने रांचीमध्ये झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात शानदार कामगिरी करत ५ गडी राखून विजय मिळवला होता. या विजयासह भारतीय संघाने कसोटी मालिकेत ३-१ ने आघाडी घेतली आहे. दरम्यान बीसीसीआयने धरमशाला कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.
धरमशाला कसोटीसाठी भारतीय संघात काही बदल करण्यात आले आहेत. मालिकेतील पहिला कसोटी खेळून दुखापतीमुळे बाहेर पडलेला केएल राहुल पाचव्या कसोटी सामन्यालाही मुकणार आहे. तर चौथ्या कसोटीत विश्रांती देण्यात आलेल्या जसप्रीत बुमराह या सामन्यातून कमबॅक करताना दिसून येणार आहे.
पहिला कसोटी सामना झाल्यानंतर केएल राहुल दुखापतीमुळे संघाबाहेर पडला होता. बीसीसीआयच्या मेडिकल टीमने त्याच्या दुखापतीची आणि फिटनेसची पाहणी केली असून त्याला लंडनमधील तज्ञांकडून तपास करुन घेण्याचा सल्ला दिला आहे. (Cricket news in marathi)
जसप्रीत बुमराह करणार कमबॅक...
भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला रांची कसोटीतून विश्रांती देण्यात आली होती. तो आता पाचव्या कसोटीतून कमबॅक करताना दिसून येणार आहे. आगामी कसोटी सामन्यासाठी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हे दोन्ही वेगवान गोलंदाज उपलब्ध असणार आहे. तर गेल्या कसोटी सामन्यात आकाश दीपने दमदार गोलंदाजी केली होती. आता अंतिम कसोटी सामन्यात कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
या सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ (Team India squad for IND vs ENG 5th Test):
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), के.एस. भरत (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.