IPL 2026 lifts ban : IPL सामन्यांवरील बंदी उठवली; या सरकारनं घेतला मोठा निर्णय

bangladesh lifts ban on ipl 2026 live telecast update : आयपीएल २०२६ आज, शनिवारपासून सुरू होणार आहे. त्याआधीच बांगलादेश सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलच्या लाइव्ह प्रेक्षपणावरील बंदी उठवण्यात आली आहे.
आयपीएल सामन्यांवरील बंदी उठवली, बांगलादेश सरकारचा मोठा निर्णय
IPL 2026 Lifts ban by Bangaladeshsaam tv
Published On

आयपीएल २०२६ (IPL 2026) सामन्यांचा थरार आज, शनिवारपासून सुरू होत आहे. १९ व्या पर्वातील पहिलाच सामना अत्यंत प्रेक्षणीय होणार आहे. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात ही लढत होत आहे. अवघ्या काही तासांत हा सामना सुरू होत आहे. त्याआधीच बांगलादेश सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएल सामन्यांच्या लाइव्ह प्रेक्षपणाबाबत यूटर्न घेतला आहे.

मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून बाहेर केल्यानंतर बांगलादेश सरकारनं आयपीएल सामन्यांचे आपल्या देशातील लाइव्ह प्रेक्षपणावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. आयपीएल स्पर्धेला आजपासून सुरूवात होणार असून, त्याआधीच बांगलादेश सरकारनं हा बंदीचा निर्णय मागे घेतला आहे. आयपीएल सामन्यांवरील बंदी उठवण्यात आली आहे. बांगलादेशचे नवनिर्वाचित माहिती आणि प्रसारण मंत्री जाहिद उद्दीन स्वपन यांनी शनिवारी या वृत्ताला दुजोरा दिला.

मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन सरकारने आयपीएल सामन्यांच्या लाइव्ह प्रेक्षपणावर बंदी घातली होती. सरकारच्या आदेशानंतर स्थानिक वाहिन्या आणि ऑपरेटर्स आयपीएल सामन्यांचे प्रेक्षपण करू शकत नव्हते. यामुळे बांगलादेशातील आयपीएल स्पर्धेचे चाहत्यांची निराशा झाली होती. हे सामने बघण्यापासून वंचित राहणार होते. मात्र, आता त्यांना हे सामने लाइव्ह अनुभवता येणार आहेत.

बांगलादेशातील नव्या सरकारने आयपीएल सामन्यांच्या प्रेक्षपणाबाबत नरमाईची भूमिका घेतली आहे. आयपीएल सामन्यांच्या प्रेक्षपणावरील बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बांगलादेश सरकारच्या या भूमिकेमुळं भारत-बांगलादेश या दोन देशांतील तणावपूर्ण संबंध निवळण्यास काही प्रमाणात मदत होणार असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आयपीएल सामन्यांवरील बंदी उठवली, बांगलादेश सरकारचा मोठा निर्णय
IPL 2026: मुंबई इंडियन्सची ताकद आणखी वाढणार; स्टार खेळाडूची संघात एन्ट्री

जाहिद यांच्या म्हणण्यानुसार, आयपीएल सामन्यांचे लाइव्ह प्रेक्षपण सुरू करण्यासाठी कुणीही आमच्याकडे अर्ज केलेला नाही. आम्ही खेळाला राजकारणाशी जोडू इच्छित नाहीत. आम्ही याकडे व्यावसायिक दृष्टीकोनातून बघत आहोत. जर कोणत्या चॅनलने आयपीएल सामन्यांचे प्रेक्षपण करण्यासाठी अर्ज केला तर, त्यावर सकारात्मक दृष्टीने विचार करण्यात येईल.

आयपीएल सामन्यांवरील बंदी उठवली, बांगलादेश सरकारचा मोठा निर्णय
IPL 2026: चिन्नास्वामीवर आज रंगणार IPL चा महासंग्राम, पाहा किती वाजता सुरु होणार सामना, कशी असेल प्लेईंग ११?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com