Australia vs South Africa World cup 2023: दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांकडून ऑस्ट्रेलियाचं वस्त्रहरण; १७७ धावांवर कांगारुंना गुंडाळलं

Australia vs South Africa World cup 2023: दक्षिण आफ्रिकेने तब्बल १३४ धावांनी ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे.
Australia vs South Africa World cup 2023
Australia vs South Africa World cup 2023Saam tv
Published On: 

Australia vs South Africa world cup 2023:

दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या ३१२ धावांचा सामना करताना ऑस्ट्रेलियाचा संघ १७७ धावांवर गारद झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. दक्षिण आफ्रिकेने तब्बल १३४ धावांनी ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे. (Latest Marathi News)

विश्वचषक स्पर्धेत आज झालेल्या दहाव्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दक्षिण आफ्रिका विजयानंतर गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियाचा विश्वचषकात सर्वात मोठा पराभव झाला आहे.

Australia vs South Africa World cup 2023
Shreyas Iyer Record: व्वा अय्यर भाई व्वा! फक्त २५ धावा केल्या, तरी मोडला विक्रम; जाणून घ्या काय आहे पराक्रम

दक्षिण आफ्रिकेने ५० षटकात ७ गडी गमावून ऑस्ट्रेलियाला ३१२ धावांचं आव्हान दिलं होतं. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम ऑस्ट्रेलियाचा संघ १७७ धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून मार्नसने सर्वाधिक ४६ धावा कुटल्या. तर या सामन्यात कागिसो रबाडाने सर्वाधिक ३ गडी बाद केले.

३१२ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात खराब झाली. ऑस्ट्रेलियाला मिचेल मार्शच्या रुपात पहिला धक्का बसला. तर वॉर्नरही अवघ्या १३ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि मार्नसने संघाची कमान सांभाळण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र, त्याला फारसं यश आलं नाही.

Australia vs South Africa World cup 2023
World Cup 2023 : भारत-अफगाणिस्तान सामन्यादरम्यान जोरदार राडा, मैदानातच भिडले फॅन्स, VIDEO Viral

मॅक्सवेलने ३ तर मार्कसने केवळ ५ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या तरबेजने ४१ व्या षटकात दोन गडी बाद करून ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.