World Cup 2023 : भारत-अफगाणिस्तान सामन्यादरम्यान जोरदार राडा, मैदानातच भिडले फॅन्स, VIDEO Viral

Viral News : आयसीसी किंवा दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमकडून या संदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
World Cup 2023
World Cup 2023Saam TV
Published On

World Cup 2023 News :

टीम इंडियाने विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा सहज पराभव केला. भारताने हा सामना 8 गडी राखून जिंकला. दोन्ही संघ मैदानात खेळत असताना स्टॅण्ड्समध्ये उपस्थित फॅन्स एकमेकांना भिडले, असा दावा करणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चाहत्यांमध्ये वाद झाल्यानंतर स्टेडियममध्ये उपस्थित अन्य प्रेक्षकांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. प्रकरण फारसं हाताबाहेर जाण्याआधी मिटलं आहे. (World Cup 2023 )

World Cup 2023
Virat-Gambhir News : मिटलं एकदाचं! विराटचं कौतुक करताना गंभीरला शब्द अपुरे, मैदानात नवीन-कोहलीची गळाभेट, VIDEO

आयसीसी किंवा दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमकडून या संदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये 11 ऑक्टोबरला झालेल्या सामन्यादरम्यान हाणामारी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या चाहत्यांच्या जर्सी पाहता हा व्हिडिओ जुना नाही. दोन्ही देशांच्या फॅन्समध्ये झालेल्या वादाचं कारण काय आणि हाणामारीत कोण कोण होते, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र हाणामारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे. (Latest Sports News)

World Cup 2023
Shubman Gill Health Update: टीम इंडियाचा धडाकेबाज सलामीवीर संघात परतणार? ईशानने शुबमनच्या तब्येतीबाबत दिली मोठी अपडेट

भारताचा 8 विकेट्सने विजय

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 गडी गमावून 272 धावा केल्या. कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने 80 धावांची तर अजमतुल्ला उमरझाईने 62 धावांची खेळी केली.

प्रत्युत्तरात भारताने 35 षटकांत दोन गडी गमावून हे लक्ष्य सहज गाठले. कर्णधार रोहित शर्माने 84 चेंडूत 16 चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 131 धावांची खेळी केल्या. या खेळीसाठी रोहित मॅन ऑफ द मॅच ठरला. विराट कोहलीदेखील सामन्यात अर्धशतक झळकावलं. विराटने 56 चेंडूत 55 धावा करत नाबाद राहिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com