Ajinkya Rahane: चौथ्या पराभवासह अजिंक्य रहाणेला अजून एक मोठा झटका; BCCI ने केली कारवाई

IPL slow over rate penalty: केकेआरचा खराब फॉर्म कायम असून चेन्नईविरुद्धच्या सामन्यात पुन्हा पराभव झाला. स्लो ओव्हर रेटमुळे कर्णधार अजिंक्य रहाणेवर 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी आता टीमवर मोठा दबाव निर्माण झाला आहे.
IPL slow over rate penalty
IPL slow over rate penaltySAAM TV
Published On

यंदाच्या सिझनमध्ये केकेआरला अजून एकही सामना जिंकता आलेला नाही. ५ सामन्यांपैकी चार सामन्यांमध्ये पराभव झाला असून एका सामन्याचा निकाल लागला नाही. मंगळवारी चिदंबरम स्टेडियमध्ये झालेल्या सामन्यातही केकेआरला पराभवाचा सामना करावा लागला. तर दुसरीकडे केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेवर कारवाई देखील करण्यात आलीये.

केकेआरचा खराब फॉर्म

या सिझनमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा खेळ अजूनही रंगात आलेला नाही. टीमने आतापर्यंत पाच सामने खेळले असून त्यापैकी चार सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे. पंजाब किंग्सविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला आणि त्यातून केवळ एक गुण मिळालाय. केकेआरच्या या परिस्थितीमुळे प्लेऑफमधील टॉप 4 मध्ये पोहोचणं आता टीमसाठी खूपच कठीण झालं आहे.

IPL slow over rate penalty
Vaibhav Suryavanshi: ठरलं तर मग...! १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी लवकरच टीम इंडियात खेळणार

सीएसकेकडून 32 रन्सने पराभव

मंगळवारी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध झालेल्या सामन्यात केकेआरला पुन्हा एकदा हार पत्करावी लागली. या सामन्यात सीएसकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये 192 रन्स केले. प्रत्युत्तरात 193 रन्सचं लक्ष्य गाठताना केकेआरची सुरुवात काही फारशी चांगली झाली नाही. तर 32 रन्सने त्यांना सामना गमवावा लागला आहे. अशातच सामन्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये केकेआरचा स्लो ओव्हर रेट असल्याचं स्पष्ट झालं.

IPL slow over rate penalty
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहमुळे मुंबईचा सलग ३ रा पराभव; आकडे वाचून तुम्हालाही बसेल धक्का

रहाणेवर 12 लाखांचा दंड

या स्लो ओव्हर रेटमुळे आयपीएलने कर्णधार अजिंक्य रहाणेवर कारवाई केलीये. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ओव्हर रेट नियमाचं उल्लंघन झाल्याने आयपीएलच्या आचारसंहितेअंतर्गत रहाणेवर 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. हा या सिझनमधील टीमचा पहिलाच गुन्हा असल्यामुळे तुलनेने कमी दंड आकारण्यात आलाय.

IPL slow over rate penalty
MI vs RCB: व्हिलन कोण? मुंबईने गमावला सलग तिसरा सामना; जाणून घ्या पराभवाची ५ प्रमुख कारणं

गुजरातविरूद्ध रंगणार पुढचा सामना

केकेआरचा पुढील सामना 17 एप्रिल रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी टीमवर खूप दबाव असणार आहे. जर पुन्हा एकदा स्लो ओव्हर रेटचा प्रकार घडला तर दंडाची रक्कम वाढून 25 लाखांपर्यंत जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com