Virat Kohli : RCB जिंकली तर विराट कोहलीचं मंदिर बांधेन, अन् विजय माल्याचं...; प्रसिद्ध अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, VIDEO व्हायरल

Nakul Mehta Video on Virat Kohli : आयपीएल २०२५ मधील RCB आणि PBKS यांच्यातील सर्वात ऐतिहासिक अंतिम सामना अखेर आज खेळला जाणार आहे. दोन्ही संघाचे चाहते कोण जिंकतं हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
Nakul Mehta Virat Kohli will build a temple
Nakul Mehta Virat Kohli will build a templeSaam Tv News
Published On

मुंबई : आयपीएल २०२५ मधील RCB आणि PBKS यांच्यातील सर्वात ऐतिहासिक अंतिम सामना अखेर आज खेळला जाणार आहे. दोन्ही संघाचे चाहते कोण जिंकतं हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत. पंजाबसाठी अनेक जण उत्सुक आहेत, तर काहींना १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विराट कोहलीने ट्रॉफी उचलावी असं वाटत आहे. याचदरम्यान, टीव्ही अभिनेता नकुल मेहता याने आजच्या अंतिम सामन्यापूर्वी एक मोठं विधान केलं आहे.

नकुल मेहता याने एक व्हिडिओ शेअर केला आणि म्हटलं आहे की, 'अखेर १८ वर्षांनंतर तो दिवस आला आहे जेव्हा आपण ट्रॉफी उचलू. मिस्टर १८, निःसंशयपणे इतिहासातील सर्वोत्तम आयपीएल खेळाडू, त्याची पहिली ट्रॉफी उचलणार आहे. तुम्ही माझ्यासोबत आहात का? आरसीबी, तुम्ही कधीही हार न मानण्याचे धैर्य आणि तुमच्या संयमाचा खरा अर्थ शिकवला आहे.'

Nakul Mehta Virat Kohli will build a temple
Pune Crime News : कारमध्ये बसवून लॉजवर नेलं, पुण्यात ४० वर्षाच्या नानासाहेबाचे ३७ वर्षीय महिलेसोबत जबरदस्ती संबंध, VIDEO काढले अन्...

विराट कोहलीसाठी मंदिर बांधेन

तो पुढे म्हणाला, 'आरसीबी , फक्त तुम्ही जिंका आणि जर तुम्ही जिंकलात तर मी कन्नड शिकेन आणि हा व्हिडिओ पुन्हा अपलोड करेन असे मी वचन देतो. मी दक्षिण भारतीय नाश्ता देखील खायला सुरुवात करेन. जिथे वाय-फाय चांगले असेल तिथे मी जाईन. तुम्ही लोक हे का करत नाही आणि मी त्यासाठी सर्व काही करेन. मी विराट कोहलीसाठी मंदिर बांधेन, नाश्त्यात, दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात रसम खाईन. मी विजय मल्ल्यांचे सर्व कर्ज देखील फेडेन. फक्त तुम्ही जिंका.'

नकुलच्या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटींनीही जोरदार कमेंट केल्या आहेत. एका युजरने लिहिलं आहे की, शेवटी, आपण ज्या स्वप्नाची वाट पाहत होतो त्या स्वप्नापासून फक्त एक पाऊल दूर आहोत. एका युजरनं लिहिलं आहे की, मी यासाठी खूप उत्साहित आहे. दुसऱ्याने म्हटलं, मी माझा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही. आज स्वप्ने सत्यात उतरणार आहेत.

Nakul Mehta Virat Kohli will build a temple
RCB साठी गुड न्यूज! मायदेशी गेलेला मॅचविनर खेळाडू भारतात परतला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com