Pune Crime News : कारमध्ये बसवून लॉजवर नेलं, पुण्यात ४० वर्षाच्या नानासाहेबाचे ३७ वर्षीय महिलेसोबत जबरदस्ती संबंध, VIDEO काढले अन्...

Pune Crime News : या प्रकाराला कंटाळून पीडित महिलेने अखेर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी नानासाहेबविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव करत आहेत.
Bibadewadi Physical Relationship with 37 Year Old Woman
Bibadewadi Physical Relationship with 37 Year Old WomanSaam Tv News
Published On

पुणे : पुण्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून, अलिकडे एका ४० वर्षीय नराधमानं एका ३७ वर्षीय विवाहित महिलेला लग्नासाठी धमकावत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं अत्याचार केल्यानंतर त्याचे फोटो आणि व्हिडीओ काढले आणि ते तिच्या वडिलांना पाठवण्याची धमकी देत तिच्यावर मानसिक दबाव टाकला.

ही घटना बिबडेवाडी भागात घडली असून, पीडित महिलेने अखेर हिम्मत दाखवून बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नानासाहेब गेल्या दोन महिन्यांपासून पीडितेला वारंवार त्रास देत होता. त्याने तिला लग्न करण्यासाठी जबरदस्ती करत तिच्यावर मानसिक दबाव निर्माण केला. एके दिवशी आरोपीने पीडितेला धमकी दिली की, 'जर तू माझ्याशी लग्न केलं नाहीस तर मी तुझ्या कामाच्या ठिकाणी येऊन फिनेल पिऊन आत्महत्या करेन'. या धमकीनं घाबरलेली पीडिता आरोपीच्या गाडीत बसून लॉजवर गेली, जिथे त्याने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले. त्यावेळी आरोपीने तिचे फोटो आणि व्हिडीओ काढले आणि पुढे याच गोष्टींचा आधार घेऊन तिच्यावर दबाव टाकू लागला की, ‘माझ्याशी लग्न कर नाहीतर हे फोटो तुझ्या वडिलांना पाठवेन.

Bibadewadi Physical Relationship with 37 Year Old Woman
Thrilling Accident Video : रस्ता ओलांडताना वाहनाची धडक, २० फूटवर उडून खाली कोसळला; कारच्या मागच्या कॅमेऱ्यात थरारक VIDEO कैद

या प्रकाराला कंटाळून पीडित महिलेनं अखेर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी नानासाहेबविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव करत आहेत.

Bibadewadi Physical Relationship with 37 Year Old Woman
Laxman Hake: आम्हाला XXXया समजतात का?, मुख्यमंत्र्यांवर बोलताना लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com