Gautam Gambhir: 'आणखी ३ ट्रॉफी..' KKR च्या विजयानंतर गौतम गंभीरने सांगितला मास्टरप्लान

Gautam Gambhir Latest News In Marathi: कोलकाता नाईट रायडर्सने हैदराबादला पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं. या विजयानंतर गौतम गंभीरने मोठं वक्तव्य केलं आहे.
Gautam Gambhir: 'आणखी ३ ट्रॉफी..' KKR च्या विजयानंतर गौतम गंभीरने सांगितला मास्टरप्लान
gautam gambhir news in marathitwitter
Published On

गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्स संघाचं नेतृत्व करताना २ वेळेस आयपीएलची ट्रॉफी जिंकली. त्यानंतर लखनऊ सुपर जायंट्स संघाला प्रशिक्षण देत त्याने संघाला २ वेळेस प्लेऑफमध्ये पोहचवलं. आयपीएल २०२४ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने त्याला आपल्या संघासोबत जोडलं आणि मेंटॉरची भूमिका सोपवली. त्याच्या मार्गदर्शनाखाली खेळताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. या शानदार कामगिरीनंतर गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होणार अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान गंभीरने आपल्या प्लानबद्दल खुलासा केला आहे.

कोलकाताने फायनलच्या सामन्यात हैदराबादला पराभूत करताच गौतम गंभीरचा उत्साह गगनात मावेनासा झाला. विजयानंतर तो जोरदार जल्लोष साजरा करताना दिसून आला. दरम्यान या विजयानंतर स्पोर्ट्सकिडासोबत बोलताना तो म्हणाला की, ' आम्हाला आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ बनण्यासाठी अजूनही ३ ट्रॉफी जिंकायच्या आहेत. हा प्रवास आता सुरू झाला आहे.

गौतम गंभीरने मेंटॉरची भूमिका योग्यरीत्या पार पाडली आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या शर्यतीत गौतम गंभीर आघाडीवर आहे. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयने गौतम गंभीरची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली आहे. लवकरच याबाबत घोषणा केली जाऊ शकते.

Gautam Gambhir: 'आणखी ३ ट्रॉफी..' KKR च्या विजयानंतर गौतम गंभीरने सांगितला मास्टरप्लान
IPL 2024 Final: सारखा स्कोर सारखं चेज! IPLच्या दोन फायनल स्क्रिप्टेड की योगायोग?

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा झाल्यानंतर राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने १३ मे रोजी अर्ज मागवले होते. हे अर्ज भरण्याची शेवटची तारीख २७ मे होती. या यादीत गौतम गंभीरचं नाव आघाडीवर असून लवकरच बीसीसीआय शिक्कामोर्तब करू शकते. भारतीय संघाच्या मुख्यप्रशिक्षकपदासाठी ऑस्ट्रेलियाचा माजी हेड कोच जस्टीन लँगर आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचा हेड कोच स्टीफन फ्लेमिंगच्या नावाची देखील चर्चा होती.

Gautam Gambhir: 'आणखी ३ ट्रॉफी..' KKR च्या विजयानंतर गौतम गंभीरने सांगितला मास्टरप्लान
IPL 2024 Playing XI: IPL 2024 स्पर्धेतील सर्वोत्तम प्लेइंग 11! तुम्हाला काय वाटतं?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com