कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये हैदराबादवर ८ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह कोलकाता नाईट रायडर्स संघाने तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबादला दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरण्याची संधी होती. मात्र फ्लॉप फलंदाजीमुळे त्यांना विजय साकारता आला नाही. दरम्यान या सामन्यानंतर काव्या मारनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सनरायझर्स हैदराबादच्या पराभवानंतर संघ मालकीण काव्या मारनने ड्रेसिंग रूममध्ये हजेरी लावली. त्यानंतर ती पराभवामुळे निराश झालेल्या खेळाडूंचा उत्साह वाढवताना दिसून आली. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काव्या मारन म्हणतेय, ' तुम्ही आम्हाला अभिमान बाळगण्याची संधी दिली आहे. मी तुम्हाला हेच सांगण्यासाठी इथे आली आहे की, तुम्ही टी -२० क्रिकेटची परिभाषा बदलली आहे. प्रत्येक जण आपल्या खेळण्याच्या पद्धतीची चर्चा करत आहे. आजचा दिवस आपल्यासाठी चांगला नसला तरीदेखील तुम्ही आतापर्यंत फलंदाजीत आणि गोलंदाजीत केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. तुम्हा सर्वांचे मन:पूर्वक आभार.' काव्या मारनचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. हैदराबादचा पहिला डाव अवघ्या १८.३ षटकात ११३ धावांवर आटोपला. कोलकाता नाईट रायडर्सला हा सामना जिंकण्यासाठी केवळ ११४ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने एकतर्फी विजय मिळवला आणि तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.