T20 World Cup 2024 Schedule: टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाचे सामने कधी?पाहा संपूर्ण वेळापत्रक
आयपीएल २०२४ स्पर्धेचा थरार समाप्त झाला असून, लवकरच टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये केले जाणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाचा एक गट अमेरिकेत दाखल झाला आहे. तर दुसऱ्या गटातील खेळाडू लवकरच खेळाडू लवकरच अमेरिकेला रवाना होणार आहेत.
स्पर्धेचा पहिला हंगाम २००७ मध्ये खेळला गेला. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने जेतेपदाचा मान मिळवला.त्यानंतर १७ वर्ष होऊन गेली आहेत, भारतीय संघाला एकदाही जेतेपद पटकावता आलं नाही.यावेळी भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय संघाचा अ गटात समावेश केला गेला असून, या गटात पाकिस्तान, कॅनडा, आयर्लंड कॅनडा आणि पाकिस्तान यांचा समावेश असणार आहे. दरम्यान हे सामने कुठे आणि किती वाजता रंगणार ? जाणून घ्या.
असं आहे भारतीय संघाचं वेळापत्रक
भारत विरुद्ध आयर्लंड - ५ जून,संध्याकाळी ८ वाजता
भारत विरुद्ध पाकिस्तान - ९ जून, संध्याकाळी ८ वाजता
भारत विरुद्ध अमेरिका- १२ जून, संध्याकाळी ८ वाजता
भारता विरुद्ध कॅनडा - १५ जून, संध्याकाळी ८ वाजता
टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल
राखीव खेळाडू..
शुभमन गिल, रिंकू सि्ंग, खलील अहमद, आवेश खान
कुठे पाहता येणार लाईव्ह
टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील सामने स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहता येणार आहेत. यासह तुम्ही हे सामने डिस्नी प्लस हॉटस्टारवर लाईव्ह पाहू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

