स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. बँकेत काम करण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी ही संधी आहे. विशेष कॅडर ऑफिसर पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जाणार आहे.
या भरतीमध्ये विकास व्यवस्थापक, रिलेशनशिप मॅनेजर, व्हीआर व्हेल्थ, इनव्हेस्टमेंट ऑफिसर, रिजनल हेड या पदासाठी रिक्त जागा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १९ जुलैपासून सुरु झाली आहे. bank.sbi/careers या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ ऑगस्ट २०२४ आहे.
या नोकरीसाठी उमेदवारांची पात्रता आणि अनुभवाच्या निकषावर मुलाखतीसाठी बोलवले जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना सर्व आवश्यक कागदपत्रे त्यात बायोडेटा, आयडी प्रुफ, वयाचा दाखला, जात प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रता ही सर्व कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
या भरतीमध्ये सेंट्रल रिसर्च टीम (प्रोजेक्ट लीड ) रेगुलर पदासाठी २ रिक्त जागा आहेत तर सेंट्रेल रिसर्च टीम (सपोर्ट)रेगुलर पदासाठी २ रिक्त जागा आहे. प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर टेक्नोलॉजी पदासाठी १ रिक्त जागा आहे तर प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (बिजनेस) पदासाठी २ रिक्त पदे आहेत. तसेच रिलेशनशिप मॅनेजर, रिजनल हेड या पदांसाठीही रिक्त जागा आहेत.
या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ७५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांना विनाशुल्क अर्ज करता येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.