Indian Navy Recruitment: भारतीय नौदलात काम करण्याची सुवर्णसंधी;७४१ पदांसाठी मोठी भरती;अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Indian Navy Recruitment 2024: भारतीय नौदलात काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. फायरमन, मल्टी टास्किंग ऑफिसर अशा विविध पदांसाठी ही भरती सुरु आहे.
Indian Navy Recruitment
Indian Navy RecruitmentSaam Tv
Published On

नौदलात काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय नौदलात भरती सुरु आहे. नौदल नागरी प्रवेश परीक्षेसाठी (ICET-01/2024) अर्ज मागवण्यात आले आहे. यासाठी ऑनलाइन पद्धतीने उमेदवार अर्ड करु शकतात. नौदलाच्या गट ब आणि क विभागातील रिक्त जागांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. २० जुलै २०२४ पासून या भरतीसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

नौदलाच्या या भरतीसाठी तुम्ही www.joinindiannavy.gov.in वर जाऊन फॉर्म भरु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ ऑगस्ट २०२४ आहे. नौदलाच्या या परीक्षेसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

Indian Navy Recruitment
Zilla Parishad Recruitment: १२ वी पास तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी;जिल्हा परिषदेत या पदासाठी सुरु आहे भरती; जाणून घ्या सविस्तर

नौदलाच्या नागरी परीक्षेअंतर्गत फायरमन, एमटीएस, कुक, फायर इंजिन ड्रायव्हर या पदांसाठी भरती केली जाईल. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांने संबंधित क्षेत्रात आयटीआय प्रमाणपत्र/ डिप्लोमा/अभियांत्रिकी/पदवीप्राप्त असणे आवश्यक आहे. या भरतीमध्ये चार्जमन पदासाठी २९ जागा रिक्त आहेत. वैज्ञानिक सहाय्यक पदासाठी ४ तर ड्राफ्ट्समन पदासाठी २ जागा रिक्त आहे. फायरमन पदासाठी ४४४ रिक्त जागा आहे. फायर इंजिन चालक पदासाठी ५८ जागा रिक्त आहे.कूक या पदासाठी ९ जागा तर मल्टी टास्किंग स्टाफमध्ये १६ जागांसाठी भरती सुरु आहे. ७४१ पदांसाठी ही भरती सुरु आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

नौदलातील या भरतीमध्ये सर्वाधिक पदे अग्निशमन दलाची आहेत. म्हणजेच फायरमन पदासाठी सर्वाधिक जागा रिक्त आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील ज्ञान असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ वर्ष असावे.

Indian Navy Recruitment
Government Job: दहावी पास तरुणांसाठी खुशखबर! तब्बल ५० हजार पदांसाठी होणार भरती; जाणून घ्या सविस्तर...

यासाठी अर्ज करताना सामान्य श्रेणीतील उमेदवारांना २९५ रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर अनुसूचित जाती आणि जमातीसह महिला उमेदवारांना विनामूल्य फॉर्म भरता येणार आहे. या नोकरसीसाठी भरती तीन टप्प्यांत केली जाणार आहे. लेखी परीक्षा, पीएसटी आणि त्यानंतर कागदपत्रे पडताळणी केल्यानंतरच उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

Indian Navy Recruitment
Government Job Vacancy 2024: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; २ लाख रुपये मासिक वेतन मिळणार; जाणून घ्या सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com